दिवेआगर ग्रामपंचायत बरखास्त करा-चोगले
By Admin | Updated: July 21, 2016 03:05 IST2016-07-21T03:05:21+5:302016-07-21T03:05:21+5:30
दिवेआगर ग्रामपंचायत बरखास्त करून येथील सरपंचासह सर्व सदस्यांवर करवाई करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.

दिवेआगर ग्रामपंचायत बरखास्त करा-चोगले
श्रीवर्धन : तालुक्यातील सर्वात मोठी व श्रीमंत समजली जाणारी दिवेआगर ग्रामपंचायत बरखास्त करून येथील सरपंचासह सर्व सदस्यांवर करवाई करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.
दिवेआगर येथील रहिवासी हरिश्चंद्र चोगले यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना लेखी पत्र पाठवून दिवेआगर ग्रामपंचायत बरखास्त करावी व येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर योग्य ती करवाई करावी अशी मागणी के ली आहे. प्रामुख्याने या पत्रामध्ये सरपंच नम्रता रसाळ व सदस्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून रवींद्र कुलकर्णी यांची जागा सीआरझेडमध्ये असल्याने घरे बांधता यावीत म्हणून ग्रामपंचायतीकडून ३० झोपड्यांना घरपट्टी लावून असेसमेंट लावण्यात आले व त्याच्या मोबदल्यात त्यांनी ग्रामपंचायतीला दोन लाख देणगी दिली असून इतरांना पाकिटे दिली आहेत, असा ग्रामसभेत आरोप झाला असून त्यांची चौकशी करावी असे पत्रांमध्ये नमूद के ले आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वेगवेगळ्या विषयाची माहिती मागविण्यासाठी १२४० अर्ज केले. परंतु ३७६ अर्जांना ग्रामपंचायतीने उत्तरे दिली, बाकी अर्ज केराच्या टोपलीत टाकल्याचा आरोप चोगले यांनी केला आहे. (वार्ताहर)
>कुलकर्णी यांच्या झोपड्यांची पाहणी करून असेसमेंट देण्यात आले होते. परंतु पुन्हा ग्रामसभेत विषय आल्याने या जागेवरती झोपड्या नाहीत म्हणून ती नोंद रद्द करण्यात आली आहे.
- नम्रता रसाळ, सरपंच