शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या बरखास्तीने निर्माण झाले अनेक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 05:08 IST

शिक्षक, विद्यार्थी चिंतित; पर्यायी व्यवस्थेअभावी निर्णय एकांगी ठरण्याची तज्ज्ञांना भीती

मुंबई : विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी फडणवीस सरकारने स्थापन केलेले महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बुधवारी बरखास्त करण्यात आले. या मंडळाच्या ८३ शाळांमध्ये शिकणाऱ्या २५ हजार विद्यार्थ्यांचे तसेच खास प्रशिक्षण देण्यात आलेल्या शिक्षकांचे भवितव्य यामुळे धूसर झाले आहे. दर्जेदार शिक्षणासाठी असलेला हा पर्याय काढून घेतल्यानंतर पुढील काहीच व्यवस्था केली नसेल तर हा निर्णय एकांगी ठरेल, अशी भीती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.अनेक गैरव्यवहार उघड झाल्याने हे मंडळ बंद करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र तसे करण्यापूर्वी सरकारने या मंडळाच्या शाळांशी चर्चा केली नाही. आता विद्यार्थी आणि शिक्षकांचे नुकसान झाल्यास ते कसे भरून काढणार; शिवाय शाळेमध्ये अभ्यासक्रमानुसार केलेले बदल पूर्ववत कसे करणार, असे प्रश्न मुंबईतील गोवंडीच्या शाळेच्या विश्वस्त जानकी हरी यांनी उपस्थित केले आहेत. मंडळाच्या संलग्नतेसाठी, शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी शाळेचा खर्च लाखांमध्ये झाला. पूर्व प्राथमिक ते तिसºया इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय? नियुक्ती केलेल्या शिक्षकांना कामावरून लगेच कसे काढणार, अशा प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी उद्विग्नता व्यक्त केली.तर, भाषातज्ज्ञ गणेश देवी, भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे प्रकाश बुरटे, आयआयटी मुंबईचे प्रा. विजय नाईक, अंनिसच्या मुक्ता दाभोलकर, मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार, अ‍ॅड. असीम सरोदे यांसह राज्यातील शिक्षक, संघटनांचे प्रतिनिधी यांनी हे मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.मानसिकतेवर होणार परिणामआंतरराष्ट्रीय मंडळ रद्द केल्याने या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होईल. पालकांनी मोठ्या आशेने पाल्याला आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन दिला होता. या निर्णयामुळे शिक्षकांवर अचानक उपासमारीची वेळ आणणाºया व्यक्तींच्या या बेजबाबदार वर्तनाला जबाबदार कोण?- उदय नरे, शिक्षक, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल, अंधेरीअनाकलनीय निर्णयसरकारचा निर्णय अनाकलनीय आहे. हा एक अत्याधुनिक आणि काळाशी सुसंगत कार्यक्रम होता. त्यामागे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची मेहनत होती. दुर्दैवाने सरकारने नवीन पर्याय दिलेला नाही. सरकार याचा फेरविचार करेल किंवा सक्षम पर्याय देईल, अशी अपेक्षा आहे.- राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल