मोदी सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास - उपमुख्यमंत्री
By Admin | Updated: August 23, 2014 00:09 IST2014-08-23T00:09:09+5:302014-08-23T00:09:09+5:30
‘अच्छे दिन’ येणार अशी गोंडस स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने महागाई वाढवली, सरकारला भाववाढ आटोक्यात ठेवता आली नाही.
मोदी सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास - उपमुख्यमंत्री
चाळीसगाव/ अमळनेर (जि. जळगाव) : ‘अच्छे दिन’ येणार अशी गोंडस स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने महागाई वाढवली, सरकारला भाववाढ आटोक्यात ठेवता आली नाही. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली.
त्यांच्या हस्ते शुक्रवारी चाळीसगाव तालुक्यात वरखेडे बुद्रुक येथे वरखेडे-लोंढे मध्यम प्रकल्पाच्या पायाभरणीचा शुभारंभ तसेच अमळनेर येथे पुलाचे भूमिपूजन व निम्म तापी प्रकल्प पाडळसरे येथे जलपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीकास्त्र सोडले. 5क् टक्क्यांहून कमी पजर्न्यमान असणा:या तालुक्यामध्ये टंचाईसदृश कामे तत्काळ सुरू केली जातील, असे आश्वासन त्यांनी या वेळी केली.