शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना थोडीतरी लाज, शरम असती तर...; रामदास कदमांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 20:52 IST

कोण तो दिनो, कोण आदित्य पांचाळी त्यांचे आदित्य ठाकरेंशी संबंध काय, या सगळ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. दिशा सालियन या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी होणे आवश्यक आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं.

मुंबई - दिशा सालियान हिच्या मृत्यूनंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. नारायण राणे यांनी जाहीरपणे आदित्य ठाकरेंचा या घटनेशी संबंध असून माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत असं सांगितले होते. दुर्दैवाने आतापर्यंत ते कुठलेही पुरावे देऊ शकले नाहीत. मात्र दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यात आदित्य ठाकरे यांचे नाव घेत त्याच्यासोबत तिघांनी मिळून माझ्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला अशी याचिका दाखल केली आहे. ही बाब इतकी गंभीर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आदित्य ठाकरे याच्यावर बलात्काराचा आरोप होतोय, ही चांगली बाब नाही असं सांगत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

रामदास कदम म्हणाले की, ज्या बाळासाहेबांनी मराठी मुलींची इज्जत, अब्रू वाचवली. त्यासाठी भगवा झेंडा खांद्यावर घेत पक्ष काढला. त्या बाळासाहेबांच्या नातवावर बलात्काराचे आरोप होतायेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थोडीतरी इज्जत, लाज, शरम असती तर तोंडाला काळे फासून देश सोडून गेले असते. अनेक गोष्टी अशा होतात पण त्याचे पुरावे मिळत नाही. उद्धव ठाकरे ज्यावेळी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांशी हाताशी धरून पुरावे नष्ट केलेत का याची माहिती घेणे आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली. 

तसेच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना फोन केला, तुमची मुले आहेत तसा माझा मुलगा आहे अशी चर्चा मी ऐकली. सत्यता किती नारायण राणे सांगतील. मात्र ही बाब महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. आदित्य ठाकरे रात्री ११ वाजता बाहेर पडतो, पहाटे ५ वाजता घरी येतो. हा रात्रभर नेमका कुठे असतो. कोण तो दिनो, कोण आदित्य पांचाळी त्यांचे आदित्य ठाकरेंशी संबंध काय, या सगळ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. दिशा सालियन या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी होणे आवश्यक आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं.

दरम्यान,  या महाराष्ट्रात मुलींची अब्रू सुरक्षित नसेल, त्यांचे खून होत असतील आणि ठाकरे कुटुंबावर आरोप होत असेल तर उद्धव ठाकरे देशाच्या पंतप्रधानांवर बोलतात, अमित शाहांवर बोलतात. एकनाथ शिंदेंवर बोलतात. वारेमाप देवेंद्र फडणवीसांवर बोलतो त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का? मातोश्री बाहेर पडण्याचाही नैतिक अधिकार नाही. दिशा सालियनचे वडील कोर्टात गेलेत, कोर्ट काय आदेश देते ते पाहू. कोर्टाने चौकशीचे आदेश दिले तर सखोल चौकशी झाली पाहिजे. जे काही खरे आहे ते बाहेर आणले पाहिजे. बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे धंदे काय सुरू आहेत हे महाराष्ट्रालाही कळले पाहिजे असंही रामदास कदम म्हणाले. 

टॅग्स :Disha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरणAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदम