दुष्काळाची ‘युनिसेफ’कडून पाहणी

By Admin | Updated: June 11, 2016 04:04 IST2016-06-11T04:04:04+5:302016-06-11T04:04:04+5:30

ग्रामीण भागातील लोकांवर दुष्काळाचा कसा परिणाम झाला आहे, हे पाहण्यासाठी ‘युनिसेफ’च्या पथकाने शुक्रवारी औसा तालुक्यातील टाका व मासुर्डी गावात सर्वेक्षण केले.

Disease inspection by 'UNICEF' | दुष्काळाची ‘युनिसेफ’कडून पाहणी

दुष्काळाची ‘युनिसेफ’कडून पाहणी

लातूर : ग्रामीण भागातील लोकांवर दुष्काळाचा कसा परिणाम झाला आहे, हे पाहण्यासाठी ‘युनिसेफ’च्या पथकाने शुक्रवारी औसा तालुक्यातील टाका व मासुर्डी गावात सर्वेक्षण केले.
देशातील १७ राज्यांत दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे़ दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी भविष्यात कशा पद्धतीने नियोजन करावे़ तसेच तीन वर्षांपासून उद्भवलेल्या दुष्काळाची प्रमुख कारणे काय?, याचा शोध आणि अभ्यास करण्यासाठी युनिसेफ व रेडआर या दोन संस्थांचे नऊ सदस्यांचे पथक बीड व लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ७ ते १० जून या कालावधीत लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात वांजरवाडा व उमरदरा, अहमदपूर तालुक्यातील काही गावांची पथकाने पाहणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Disease inspection by 'UNICEF'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.