कायद्यातील सुधारणांपूर्वी संघटनांशी चर्चा

By Admin | Updated: February 12, 2015 05:32 IST2015-02-12T05:32:03+5:302015-02-12T05:32:03+5:30

राज्यातील विविध असंघटीत प्रलंबित कामगारांचे प्रश्न, कामगार मंडळांवरील रखडलेल्या नियुक्त्या, होऊ घातलेले बदल आणि त्याचा कामगारांच्या जीवनावर होणारा परिणाम

Discussions with organizations before the reform of the law | कायद्यातील सुधारणांपूर्वी संघटनांशी चर्चा

कायद्यातील सुधारणांपूर्वी संघटनांशी चर्चा

मुंबई : स्महाराष्ट्रामध्ये कामगार कायद्यामध्ये कुठलेही बदल करण्यापूर्वी कामगार संघटनांशी चर्चा केली जाईल. चर्चेशिवाय कोणतेही बदल केले जाणार नाहीत, असे आश्वासन कामगार मंत्री प्रकाश महेता यांनी दिले आहे.
राज्यातील विविध असंघटीत प्रलंबित कामगारांचे प्रश्न, कामगार मंडळांवरील रखडलेल्या नियुक्त्या, होऊ घातलेले बदल आणि त्याचा कामगारांच्या जीवनावर होणारा परिणाम; या विषयावर चर्चा करण्यासाठी प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ते बोलत होते.
मंत्रालयीन दालनात बुधवारी सायंकाळी ४ वाजता झालेल्या बैठकीला कामगार आयुक्त, भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सरचिटणीस अण्णा धूमाळ, प्रदेश संघटन मंत्री जयंतराव देशपांडे, प्रदेश पदाधिकारी अजित कुलकर्णी, वेदा आगटे, अण्णा देसाई, अ‍ॅड. अनिल ढुमणे आणि रवींद्र पुरोहित उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Discussions with organizations before the reform of the law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.