शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Vinod Tawde: विनोद तावडे राज्यसभेवर जाणार? पीयूष गोयल यांच्याही नावाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 07:29 IST

संख्याबळानुसार भाजपला महाराष्ट्रातून दोन उमेदवार स्वबळावर राज्यसभेत पाठविता येतात. सध्या भाजपचे तीन उमेदवार राज्यसभेत आहेत.

- सुरेश भुसारीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या भाजपच्या उमेदवाराबद्दल उत्सुकता असून, दोन जागांसाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचे नाव शर्यतीत  असल्याचे समजते.

संख्याबळानुसार भाजपला महाराष्ट्रातून दोन उमेदवार स्वबळावर राज्यसभेत पाठविता येतात. सध्या भाजपचे तीन उमेदवार राज्यसभेत आहेत. त्यांपैकी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पुन्हा राज्यसभा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोयल राज्यसभेतील सत्तारूढ पक्षाचे नेतेसुद्धा आहेत. उर्वरित एका जागेसाठी खरी रस्सीखेच सुरू आहे. सध्या राज्यसभेत असलेले डॉ. विनय सहस्रबुद्धे व डॉ. विकास महात्मे यांना उमेदवारी पुन्हा मिळणार काय? हा मुख्य प्रश्न आहे. डॉ. सहस्रबुद्धे यांच्याकडे मंत्रिपदाचा दर्जा असलेले भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्षपदही आहे. डॉ. सहस्रबुद्धे व डॉ. महात्मे पहिल्यांदाच राज्यसभेत गेले आहेत. दोन्ही सदस्यांचा राज्यसभेतील  सहभागही चांगला राहिला आहे. 

धक्कातंत्राचा वापर? भाजपकडून धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. छत्रपती संभाजीराजे यांनीही राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा केल्यामुळे भाजपमध्ये नेमके कोणते समीकरण समोर येईल, हे सांगता येत नाही.

 संभाजीराजेंना पाठिंबा दिल्यास पुन्हा मराठा समाजाला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर भाजपकडून अनपेक्षितपणे एखादे वेगळेच नाव समोर येऊ शकते.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेRajya Sabhaराज्यसभा