सुट्टया पैशांची चणचण : आडत कंपन्या बंद
By Admin | Updated: November 17, 2016 20:05 IST2016-11-17T20:05:56+5:302016-11-17T20:05:56+5:30
शासनाने गेल्या आठवडयापासुन पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्याने त्याचा परिणाम बाजारसमितीत झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे

सुट्टया पैशांची चणचण : आडत कंपन्या बंद
संदीप झिरवाळ
नाशिक, दि. 17 : शासनाने गेल्या आठवडयापासुन पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्याने त्याचा परिणाम बाजारसमितीत झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. गुरूवारी बाजारसमितीत सुट्टया पैशांची चणचण निर्माण झाल्याने काही आडत कंपन्यांनी कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला.
काही दिवसांपुर्वीच बाजारसमितीतील व्यापारी व आडत्यांनी बाजारसमितीशी पत्रव्यवहार करून सलग तीन दिवस दुपारी होणारे लिलाव बंद केले होते. गुरूवारी पुन्हा बाजारसमितीत सुट्टया पैशांची चणचण निर्माण झाल्याने व त्यातच शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बाजारसमितीतील आडत्यांकडे पैसे नसल्याने तसेच आता शेतकरी पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारत नसल्याने गुरूवारी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी केली.
सुट्टया पैशामुळे अडचण
शासनाने पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा परिणाम बाजारसमितीत झाला आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाला कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी गुरूवारी व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला. येत्या काही दिवसांत सुट्टया पैशांची चणचण दूर झाल्यास व्यवहार सुरळीत होईल.
रंजन शिंदे, आडता,