एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पक्षाच्या उपनेते आणि विदर्भ समन्वय पदाचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा पाठवला आहे. नरेंद्र भोंडेकर हे भंडाराचे आमदार आहेत.
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक होते, पण मोजक्या नेत्यांना संधी मिळाली. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा होती, पण संधी न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तार शिंदेंच्या शिवसेनेने काही जुन्या, तर काही नवीन नेत्यांना संधी दिली आहे. नवीन चेहऱ्यात संधी मिळण्याची भोंडेकर यांना आशा होती. पण, त्यांना मंत्रिपदाबद्दल कॉल न आला नाही. त्यानंतर त्यांनी शिवसेना उपनेते आणि विदर्भ समन्वयक या दोन्ही पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.
तीन जुन्या नेत्यांना संधी नाही
शिंदेंच्या शिवसेनेकडून गेल्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या तीन नेत्यांना यावेळी संधी देण्यात आलेली नाही. यात अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांचा समावेश आहे. त्यांच्याऐवजी संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक यांना संधी देण्यात आली आहे.