भुजबळांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तुरुगांकडे रवानगी
By Admin | Updated: October 12, 2016 14:35 IST2016-10-12T08:44:43+5:302016-10-12T14:35:21+5:30
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्यामुळे जे.जे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे

भुजबळांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तुरुगांकडे रवानगी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्यामुळे जे.जे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आणि त्यांची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोड जेल कडे करण्यात आली आहे. प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुले त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याबातचा निर्णय घेण्यात येऊ शकतो असा अंदाज माध्यात वर्तवला जात होता. भुजबळ यांच्या वकीलांनी त्यांनी इतर रुगणालयात उपचारासाठी हलवण्यात यावे अशी ममागणी केली होती मात्र, आर्थर रोड जेलने ती नाकारली आहे.
दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या महिन्यात जे. जे. रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. अस्वस्थ वाटू लागल्याने सप्टेंबर महिन्यात ऑर्थर रोड कारागृहातून हलवून जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवत होता तसेच तापही होता आणि त्यांच्या प्लेटलेट्स काही प्रमाणात कमी झाल्या होत्या.