अण्णा हजारे यांना डिस्चार्ज
By Admin | Updated: April 8, 2016 02:52 IST2016-04-08T02:52:59+5:302016-04-08T02:52:59+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना गुरुवारी नगर येथील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ते सायंकाळी राळेगणसिद्धी येथे रवाना झाले

अण्णा हजारे यांना डिस्चार्ज
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना गुरुवारी नगर येथील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ते सायंकाळी राळेगणसिद्धी येथे रवाना झाले. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यापुढील पाच दिवस राळेगणसिद्धी येथेच डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्या तब्ब्येतीची काळजी घेतली जाणार आहे.
हजारे यांना सात दिवसांपूर्वी उन्हाचा त्रास झाल्याने अशक्तपणा आला होता. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी सांगितले.