अग्निशमन दलाच्या १६ जवानांना डिस्चार्ज
By Admin | Updated: July 21, 2014 03:29 IST2014-07-21T03:29:21+5:302014-07-21T03:29:21+5:30
लोटस बिझनेस पार्क या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये अग्निशमन दलाच्या एकूण २० जखमी जवानांपैकी कमी प्रमाणात जखमी झालेल्या

अग्निशमन दलाच्या १६ जवानांना डिस्चार्ज
मुंबई : लोटस बिझनेस पार्क या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये अग्निशमन दलाच्या एकूण २० जखमी जवानांपैकी कमी प्रमाणात जखमी झालेल्या १६ जवान, अधिकाऱ्यांना डिस्चार्ज दिल्याची माहिती कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीताराम गावडे यांनी दिली.
शुक्रवारी आग विझवताना जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना, अधिकाऱ्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात केले होते. खरे पाहता यांना रुग्णालयातील बर्न वॉर्डमध्ये दाखल केले पाहिजे होते, मात्र यांना मेल सर्जरी वॉर्डमध्ये दाखल केले. २० जवानांना कूपर रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले होते. १६ जणांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा होत्या. यामुळे त्यांना याच रुग्णालयात उपचार दिले, तर जास्त प्रमाणात भाजलेल्या ४ जणांना येथे बर्न वार्ड नसल्याने ऐरोलीच्या बर्न सेंटरमध्ये हलवले होते. १६ जणांची रविवारी तपासणी केली. यामध्ये सर्व जणांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना रविवारीच डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे डॉ. गावडे यांनी सांगितले. भाजलेल्या व्यक्तींना सर्जरी वॉर्डमध्ये का दाखल केले, यावर गावडे यांनी सांगितले की, भाजलेल्या व्यक्तींना देखील इतर उपचार करायचे असतील तर सर्जरी वॉर्डमध्ये दाखल करण्यात येते. या १६ जणांवर इतर उपचारही करायचे होते, म्हणूनच त्यांना सर्जरी वॉर्डमध्ये दाखल केले.