शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालक आता थेट ऑनलाईन भेटणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 06:00 IST

राज्य पोलीस मुख्यालयातील कामात गती व पारदर्शकता आणण्यात अप्पर महासंचालक राजेंद्रसिंह, संजीवकुमार सिंघल, संजयकुमार यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

-  डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : राज्याच्या पोलीस महासंचालकांना भेटण्याची प्रक्रिया अतिशय सोपी केल्यामुळे दररोज अनेक अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन  अडचणींचे निराकरण करून घेत आहेत. आता तर संजय पांडे व सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलीस शिपायांनासुद्धा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.

राज्य पोलीस मुख्यालयातील कामात गती व पारदर्शकता आणण्यात अप्पर महासंचालक राजेंद्रसिंह, संजीवकुमार सिंघल, संजयकुमार यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. कधीकाळी राज्याच्या पोलीस मुख्यालयात कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवेश करणे व आपल्या नोकरी विषयक अडचणीसाठी वरिष्ठांची भेट होणे, भेट झालीच तर अडचणींचे निराकरण होणे हे दुरापास्तच होते. या अडचणी, अडचणींचे ‘अर्थ ‘व दगडात बांधकाम असलेली इमारत या पार्श्वभूमीवर अनेकजण याचा उल्लेख दगडीचाळ असा करीत. सध्या मात्र सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राज्य पोलीस मुख्यालयाची दारे सताड उघडी आहेत. इतकेच नव्हे तर सर्व प्रकरणांची माहिती मुक्तपणे देण्यात येत आहे.पूर्वीची पद्धतn    महासंचालक कार्यालयात जाण्यापूर्वी परवानगीसाठी अर्ज व मुख्यालयातून दिलेल्या वेळेतच भेट.n    आठवड्यात फक्त १ दिवस मर्यादित लोकांच्या मुलाखती.n    अनेकवेळा अर्ज महासंचालक कार्यालयात पोहोचत नसे किंवा पोहोचला तर वेळ दिली जात नसे.n    मुलाखत झाली तरी निराकरणाचा  कालबद्ध कार्यकाल नसे.

अर्जाची पद्धतn    परवानगीची आवश्यकता नाही. n    मुलाखतीसाठी येणाऱ्यांसाठी विश्रागृहात थांबण्याची सोय.n    कामकाजाच्या दिवशी दररोज मुलाखत.n    सकाळच्या सत्रात नाव नोंदणी करून आपला अर्ज द्यावा लागतो.n    दररोज पावणे तीन वाजता सभागृहात अर्जाच्या सर्व माहिती व संचिकेसह संबंधित अधिकारी हजर.n    बदली, पदोन्नतीच्या यादीत नाव आहे काय, किती क्रमांकावर आहे, कोणत्या ठिकाणचा प्रस्ताव आहे या माहितीचे मुक्तपणे वितरण.n    ३ वाजता महासंचालक व इतर वरिष्ठ सभागृहात.n    प्रत्येकाचे गाऱ्हाणे ऐकून संचिकेतील माहिती घेऊन कालबद्ध निराकरण दिलेल्या कालावधीत काम झाले नाही तर पुन्हा भेटण्याची तारीख निश्चित.n    अर्जावरच निर्णयाची नोंद . यामुळे पुन्हा संचिकेत टीपणी लिहून अनेक टेबलवर फिरण्याची आवश्यकता नाही.n    एखाद्याने एकट्याने भेटण्याची विनंती केली तर यासाठी वेळ देण्यात येतो.

राज्य पोलीस मुख्यालयात दररोज ३०० ते ४०० तक्रारी प्राप्त होतात. यात पोलीस व नागरिकांचा दोघांचाही समावेश असतो. प्रत्येक महिन्याकाठी सुमारे ६ हजार अशा अर्जांचे पारदर्शकपणे निराकरण करण्यात येते. एकाच कार्यालयात होणाऱ्या तक्रारींच्या निराकरणाची संख्या ही राज्यात सर्वाधिक असावी.- राजेंद्र सिंह, अप्पर पोलीस महासंचालक(कायदा व सुव्यवस्था)

टॅग्स :Policeपोलिस