शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

पोलिस महासंचालक रजनीश सेठ MPSC चे नवे अध्यक्ष?; फाइल निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 08:17 IST

एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती.

यदु जोशी 

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी सध्याचे राज्य पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीचा चेंडू आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात आहे. 

एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तेव्हा रजनीश सेठ यांनीही अर्ज केला होता. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आलेल्या अर्जांची छाननी करून तीन नावांची यादी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठविली. या तिघांमध्ये रजनीश सेठ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात सेठ यांचे नाव आघाडीवर आहे.  

यापूर्वीही आयपीएस अधिकाऱ्यांनी हे पद महाराष्ट्रात भूषविलेले आहे. रजनीश सेठ यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती फेब्रुवारी २०२२ मध्ये झाली होती. ते येत्या डिसेंबरमध्ये निवृत्त होणार होते. मात्र, आता ते एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून नवीन इनिंग सुरू करण्याची शक्यता आहे. वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत ते या पदावर राहू शकतील. 

आयोगाचे विक्रमी काम  किशोरराजे निंबाळकर यांना एमपीएससी अध्यक्ष म्हणून १ वर्ष ११ महिन्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ मिळाला. त्यात विक्रमी काम आयोगाने केले. २०२१ मध्ये आयोगाने २७५ जाहिराती दिल्या, पदसंख्या होती ५ हजार ४७, मुलाखती घेतल्या ७७९ आणि शिफारशी केल्या ९९. २०२२ मध्ये १०८ जाहिराती आयोगाने दिल्या. पदसंख्या होती, ६५७६, मुलाखती घेतल्या ७४१९ आणि शिफारशी केल्या ४९७७. तसेच, २०२३ मध्ये ६० जाहिराती दिल्या, पदसंख्या होती १० हजार ५२९ , मुलाखती घेतल्या ९३३५ आणि नोकरीसाठी शिफारशी केल्या ३९२८....तर नवीन महासंचालक कोण? रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यास नवीन महासंचालक कोण होणार याचीही चर्चा रंगणार आहे. सध्या केंद्र सरकारच्या सेवेत (महासंचालक इंडो-तिबेट सीमा पोलिस) असलेल्या रश्मी शुक्ला यांना संधी मिळू शकते. रजनीश सेठ १९८८ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. या तुकडीच्या रश्मी शुक्ला या एकच अधिकारी आहेत. जून २०२४ मध्ये त्या निवृत्त होतील. या निमित्ताने राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा