निबंध स्पर्धेत दिप्ती नाडकर्णी कोकण विभागात प्रथम
By Admin | Updated: November 5, 2014 00:03 IST2014-11-04T21:38:23+5:302014-11-05T00:03:38+5:30
‘ग्रामीण महाराष्ट्र कसा असला पाहिजे?’ या विषयांतर्गत ‘स्वच्छता, आरोग्य आणि वीज’ हा विषय निवडून

निबंध स्पर्धेत दिप्ती नाडकर्णी कोकण विभागात प्रथम
कणकवली : डॉ. गोपाळकृष्ण गोखले यांच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्त ‘ग्यान की वाचनालय’ पुणे यांच्यामार्फत आयोजित निबंध स्पर्धेत शिवडाव विद्यालयाच्या दिप्ती नाडकर्णी हिने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविला.
‘ग्रामीण महाराष्ट्र कसा असला पाहिजे?’ या विषयांतर्गत ‘स्वच्छता, आरोग्य आणि वीज’ हा विषय निवडून दिप्ती हिने भविष्यातील ग्रामीण महाराष्ट्राचे दर्शन आपल्या निबंधातून घडविले. एकूण ७ हजार २८ स्पर्धकांच्या निबंधातून तिच्या निबंधाला कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या गौरवास्पद यशाबद्दल पुणे येथे आयोजित कार्यक्रमात रूपये ३ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले.
निबंध लेखन स्पर्धेत दिप्ती हिने अनेकवेळा उत्तम यश संपादन केले आहे. मुख्याध्यापक ए. बी. पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष प्र. तु. सावंत, खजिनदार का. गो. शिरसाट, सदस्य वि. वि. गावकर, आ. ह. लाड, शिवडाव सेवा संघ मुंबई अध्यक्ष राजेंद्र सावंत, कार्यवाह मोहन पाताडे, म. कृ. तवटे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिप्ती हिचे अभिनंदन केले
आहे. (वार्ताहर)
यशदा पुणे येथील समारंभात दिप्ती नाडकर्णी हिला डॉ. माशेलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.