डिंपल, टिष्ट्वंकल, अक्षयचा आज फैसला
By Admin | Updated: April 9, 2015 04:27 IST2015-04-09T04:27:38+5:302015-04-09T04:27:38+5:30
दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याचा दावा करणाऱ्या अनिता आडवाणी यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया

डिंपल, टिष्ट्वंकल, अक्षयचा आज फैसला
मुंबई : दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याचा दावा करणाऱ्या अनिता आडवाणी यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया, टिष्ट्वंकल खन्ना व अभिनेता अक्षय कुमार यांच्याविरोधात दाखल केलेली खाजगी तक्रार रद्द होणार की नाही, यावर उद्या गुरुवारी उच्च न्यायालय निकाल देणार आहे.
आडवाणी यांनी महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर ही तक्रार केली आहे. कौटुुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही तक्रार केली आहे. मी राजेश खन्ना यांच्यासोबत राहत होते. त्यांच्या निधनानंतर डिंपल, टिष्ट्वंकल व अक्षय कुमारने मला राजेश खन्ना यांच्या आशीर्वाद बंगल्यातून हुसकावून बाहेर काढले आहे. हे गैर असून, मी खन्ना यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. यांच्या मालमत्तेवर माझाही अधिकार आहे. त्यामुळे डिंपल यांनी मला देखभाल खर्च द्यावा व राहण्यासाठी घरदेखील द्यावे, अशी मागणी आडवाणी यांनी तक्रारीत केली आहे. त्याची दखल घेत महानगर दंडाधिकारी यांनी या तिघांविरोधात समन्स जारी केले. याविरोधात या तिघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. एम. एल. ताहिलयानी यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. मी राजेश खन्ना यांची पत्नी आहे. त्यांच्या मालमत्तेवर माझाच अधिकार आहे. तेव्हा अडवाणी यांना देखभाल खर्च देण्याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तिवाद डिंपल यांच्यातर्फे करण्यात आला. तर आडवाणी यांच्या तक्रारीत काहीच तथ्य नाही, असा दावा अक्षय याच्याकडून करण्यात आला. (प्रतिनिधी)