शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Dilip Walse Patil: किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास 'शूट अ‍ॅट साईट'ची ऑर्डर? गृहमंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 14:32 IST

Dilip Walse Patil: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्याची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून(CISF) गंभीर दखल घेण्यात आली आहे.

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiyya) यांच्या गाडीवर खार पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्याची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (CISF) गंभीर दखल घेण्यात आली असून, झेड दर्जाची सुरक्षा असलेल्या सोमय्यांवर यापूढे हल्ला झाल्यास 'शूट अ‍ॅट साईट'चे आदेश देऊ, असा कठोर पवित्रा CISF ने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

आज दिलीप वळसे पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. CISFने मुंबई पोलिसांना खरोखरच असे सांगितले आहे का, असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, "CISF ने असा काही आदेश दिला असेल,मला असे वाटत नाही की. असा आदेश देण्याची परवानगी कोणालाच नसते. त्यांचे काम संरक्षण करण्याचे आहे. महाराष्ट्र पोलीस किंवा CISF अशा पद्धतीचा निर्णय घेत नाहीत. तरीही या माहितीची मी खातरजमा करेन," असं वळसे-पाटील म्हणाले.

नवनीत राणांना कोठडीत वाईट वागणूक?खासदार नवनीत राणा यांनी पोलीस कोठडीत त्यांच्यासोबत हीन वागणूक झाल्याचा आरोप केल्याप्रकरणी दिलीप वळसे पाटील यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. "नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात मी स्वत: चौकशी केली आणि तसं काही घडलेल नाही. त्यांच्यासोबत कोणतीही हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नाही. राणा दाम्पत्यावर आतापर्यंत झालेली कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे. याबाबत मी अधिक बोलणार नाही. कारण त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत तथ्यावर आधारित माहिती आमच्याकडे मागितली आहे. ती माहिती लवरकच पाठवण्यात येईल", असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.  

संबंधित बातमी- Z सुरक्षा असलेल्या किरीट सोमैयांवर दोनदा हल्ले, CISFने आपल्या जवानांना दिले खास आदेश

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाShiv Senaशिवसेना