दिलीप पटेल यांचे नगरसेवकपद रद्द जात प्रमाणपत्र अवैध : भाजपाला मोठा धक्का

By Admin | Updated: June 11, 2015 08:50 IST2015-06-11T02:36:26+5:302015-06-11T08:50:00+5:30

गेले तीन टर्म नगरसेवकपदी निवडून आलेले भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर दिलीप पटेल यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे़

Dilip Patel's corporator's cancellation certificate invalid: BJP big push | दिलीप पटेल यांचे नगरसेवकपद रद्द जात प्रमाणपत्र अवैध : भाजपाला मोठा धक्का

दिलीप पटेल यांचे नगरसेवकपद रद्द जात प्रमाणपत्र अवैध : भाजपाला मोठा धक्का

मुंबई : गेले तीन टर्म नगरसेवकपदी निवडून आलेले भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर दिलीप पटेल यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे़ त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्दबातल ठरल्याचे निवडणूक आयोगाने आज जाहीर केले़ गटनेते, सुधार समिती अशी महत्त्वाची पदे पटेल यांनी भूषविली आहेत़ त्यामुळे त्यांचे पद रद्द होणे, हा भाजपासाठी मोठा धक्का आहे़
सन २०१२च्या निवडणुकीत दिलीप पटेल यांनी प्रभाग क्ऱ ६३ मधून निवडणूक लढवली़ हा वॉर्ड नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गासाठी राखीव होता़ पटेल यांनी लेवा पाटीदार या जातीचे प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढविली़ मात्र या वॉर्डातून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराने त्यांच्या विरोधात लघुवाद न्यायालयात धाव घेतली़ त्यानुसार झालेल्या छाननीत पटेल यांची जात या प्रवर्गात असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही़ त्यानुसार त्यांचे नगरसेवकपद रद्द ठरत असल्याचे आज जाहीर करण्यात आले़
१९९७ पासून पटेल भाजपामध्ये आहेत़ भाजपा आणि शिवसेनेमधील मतभेद उघड होण्यापूर्वीपासूनच पटेल यांनी सेनाविरोधी भूमिका घेतली होती़ त्यांचे पद रद्द झाल्यामुळे भाजपाचे नुकसान झाले असल्याचा सूर भाजपामधून व्यक्त होत आहे

Web Title: Dilip Patel's corporator's cancellation certificate invalid: BJP big push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.