दिल डिजिटल डिमांड : ऑक्सिजन सर्व्हे
By Admin | Updated: March 11, 2016 16:53 IST2016-03-10T18:45:32+5:302016-03-11T16:53:38+5:30
सतत मोबाईल आणि कम्प्युटरला चिकटलेली ही मुलं बाकी काही वाचत नाहीत, रोजचा पेपर तरी वाचतात की नाही माहिती नाही, किमान जनरल नॉलेज तरी यांच्याकडे असतं का हेच माहिती नाही..अशा ढीगभर शंका उपस्थित होत असतात.

दिल डिजिटल डिमांड : ऑक्सिजन सर्व्हे
ऑक्सिजन टीम
सतत मोबाईल आणि कम्प्युटरला चिकटलेली ही मुलं बाकी काही वाचत नाहीत, रोजचा पेपर तरी वाचतात की नाही माहिती नाही, किमान जनरल नॉलेज तरी यांच्याकडे असतं का हेच माहिती नाही..अशा ढीगभर शंका उपस्थित होत असतात.
ऐकून ऐकून कान किटल्यावर आता आम्ही ठरवलं, की चला, शोधूनच काढू;
की सतत ऑनलाईन असणारी मुलं तिथे करतात काय? तर तेच शोधायला तुमची मदत हवीय.
आपल्या मोबाईलवर पन्नास-शंभर रुपयांचा नेटपॅक मारुन तुम्ही नेमकं काय वाचता? कुठेकुठे जाता? तुम्हाला काय शोधायचं असतं? इत्यादी इत्यादी इत्यादी...
- ते शोधण्यासाठी मदत म्हणून एक प्रश्नावली पुढे दिली आहे. फार नाही 5 ते 10 मिनिटं जास्तीत जास्त लागतिल यासाठी...