राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल करणार - मुख्यमंत्री
By Admin | Updated: July 31, 2016 16:36 IST2016-07-31T16:36:27+5:302016-07-31T16:36:27+5:30
राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल करणार........नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा घरपोच मिळाव्यात यासाठी नागपूर जिल्हा हा 2 ऑक्टोबर पर्यंत डिजीटल जिल्हा करण्यात येणार आहे

राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल करणार - मुख्यमंत्री
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३१ : राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल करणार........नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा घरपोच मिळाव्यात यासाठी नागपूर जिल्हा हा 2 ऑक्टोबर पर्यंत डिजीटल जिल्हा करण्यात येणार आहे.या अंतर्गत सर्व ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबरने जोडण्यात येऊन शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा ऑनलाईन उपलब्ध होतील. जिल्हयात 350 सेवा 2 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन करुन या संपूर्ण सेवा मोबाईल ॲपवर उपलब्ध होणार असल्यामुळे जनतेला यापुढे शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
डिजीटल क्रांतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील सेवा व सुविधा यामध्ये फरक राहणार नाही. 11 हजार डिजीटल शाळामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी पालकांची संख्या वाढत आहे.