गडकरींच्या कामात एका व्यक्तीचा खोडा
By Admin | Updated: July 27, 2015 00:44 IST2015-07-27T00:44:10+5:302015-07-27T00:44:10+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची निर्णयक्षमता चांगली असून ते तात्काळ निर्णय घेणारे नेते आहेत. असे असतानाही त्यांना ‘एका’ व्यक्तीने

गडकरींच्या कामात एका व्यक्तीचा खोडा
चंद्रपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची निर्णयक्षमता चांगली असून ते तात्काळ निर्णय घेणारे नेते आहेत. असे असतानाही त्यांना ‘एका’ व्यक्तीने थांबवून ठेवले आहे, असे भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रहमण्यम स्वामी यांनी चंद्रपूर येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. त्यामुळे ही व्यक्ती नेमकी कोण याविषयीचे तर्कवितर्क सुरू झाले.
गडकरी पक्षाचे वजनी नेते आहेत. भाजपाचे अध्यक्ष म्हणून गडकरी योग्य नेते आहेत. त्यांची निर्णय क्षमता योग्य असतानाही थांबविण्यात आले आहे. त्यांना रोखणारी व्यक्तीदेखील आपले मित्र आहेत, असे सांगत स्वामी यांनी ती व्यक्ती कोण, हे सांगण्यास मात्र नकार दिला. याकूब मेमन याच्या फाशीबाबत मुस्लीम संघटनांद्वारे केला अभिनेता सलमान खान स्वत: आरोपी आहे; अशा वेळी मेमनविषयी सल्ला देणे सलमानला शोभा देत नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)