शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

विधान परिषदेत वेगळे सूर; महायुती टिकणार की नाही? मित्रपक्षांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:29 IST

लोकसभेला एकत्र असलेल्या महायुतीतील पक्षांची स्वबळ अजमावण्याची भाषा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध दंड थोपटण्याची शक्यता आहे. लोकसभेला एकत्र असलेल्या महायुतीतील तीन पक्षांनी उमेदवार परस्पर जाहीर करणे सुरू केले असल्याने या निवडणुकीत महायुती टिकणार की नाही या बाबत साशंकता आहे. विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून अजित पवार गट आणि शिंदे सेनेत संघर्ष होणार असे चित्र आहे. अजित पवार गटाकडून या मतदारसंघात शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नलावडे यांच्या नावाची घोषणा केली. नलावडे हे अजित पवार गटाचे मुंबई कार्याध्यक्ष आहेत.

याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास शिंदे सेनेचे शिवाजी शेडगे इच्छुक आहेत. शेडगे स्वतः शिक्षक असून शिंदे सेनेच्या शिक्षक सेनेचे राज्य समन्वयक आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्ती आहेत. २०१८ मध्ये या निवडणुकीत तेव्हाच्या एकत्रित शिवसेनेकडून शेडगे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र ते दुसर्या क्रमांकावर राहिले. शिवसेनेने ही जागा यापूर्वी लढल्याने शिंदे सेना या जागेवर दावा सांगण्याची शक्यता आहे. त्यातच अजित पवार गटानेही या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्याने महायुतीत पेच निर्माण झाला आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये संघर्ष

  • विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून मनसे आणि भाजप आमने-सामने आली आहे. 
  • मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मनसेचे खेडमधील नेते वैभव खेडेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
  • मनसेचे नेते बाळा नांदगावकर सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे यांना भेटले. भाजपनेही या जागेवर हक्क सांगितला आहे.
  • कोकण पदवीधरची जागा आमची हक्काची आहे.तिथे आमचे निरंजन डावखरे आमदार आहेत. 
  • आम्ही ही जागा नक्की लढू. मनसेला आमच्या शुभेच्छा आहेत, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी माध्यमांना सांगितले.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVidhan Parishadविधान परिषद