वाशिमच्या चिमुकल्याची आगळीवेगळी मिरवणूक

By Admin | Updated: September 15, 2016 18:53 IST2016-09-15T18:42:47+5:302016-09-15T18:53:14+5:30

संपुर्ण राज्यभर भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. काही ठिकाणी पारंपारीक पद्धतीने तर काही ठिकाणी डीजेच्या तालावर भक्त आपल्या बाप्पाला पुढील वर्षी लवकर या असं सांगत आहेत.

A different procession from Washim's Chinmule | वाशिमच्या चिमुकल्याची आगळीवेगळी मिरवणूक

वाशिमच्या चिमुकल्याची आगळीवेगळी मिरवणूक

ऑनलाइन लोकमत

वाशिम : संपुर्ण राज्यभर भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. काही ठिकाणी पारंपारीक पद्धतीने तर काही ठिकाणी डीजेच्या तालावर भक्त आपल्या बाप्पाला पुढील वर्षी लवकर या असं सांगत आहेत. 
विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक गणेश मंडळ वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे भाविकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असतानाच वाशिम शहरातील शाश्वत सचिन पेंढारकर या चिमुकल्याने आपल्या घरच्या गणरायाला आपल्याच छोट्याशा वाहनावर स्थापित करून अतिशय आगळी वेगळी मिरवणूक काढली.शाश्वतची ही मिरवणूक शहरामध्ये आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरली.
 सर्वच गणेश मंडळे आपले वेगळे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करीत असताना चिमुकल्या शाश्वतने त्याच्या खेळण्याच्या इलेक्ट्रीक कारमध्ये घरातील गणपती स्थापित करून सर्वांचं लक्ष वेधलं. या चिमुकल्याने याच कारमध्ये विसर्जनस्थळापर्यंत गणेशाला घेऊन जात भावपूर्ण निरोप दिला.

Web Title: A different procession from Washim's Chinmule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.