शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विलीनीकरणावरून राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये मतभिन्नता, शरद पवार गटाकडून तयारी; अजित पवार गट अनुत्सुक?

By यदू जोशी | Updated: January 31, 2026 12:42 IST

NCP Merger News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचे विलिनीकरण लगेच होईल असे सध्यातरी दिसत नाही. सत्तेत असलेला अजित पवार गट हा त्याबाबत फारसा उत्सुक नसल्याचे दिसत आहे. त्याचवेळी शरद पवार गट मात्र विलिनीकरणाची आशा बाळगून असल्याचे चित्र असले तरी त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

- यदु जोशीमुंबई -  राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचे विलिनीकरण लगेच होईल असे सध्यातरी दिसत नाही. सत्तेत असलेला अजित पवार गट हा त्याबाबत फारसा उत्सुक नसल्याचे दिसत आहे. त्याचवेळी शरद पवार गट मात्र विलिनीकरणाची आशा बाळगून असल्याचे चित्र असले तरी त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

अजित पवार हयात असताना विलिनीकरणाबाबत दोन्ही गटांच्या पाच-सहा बैठका झाल्या होत्या आणि ११ फेब्रुवारीला दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय कार्यकारिणींची एकत्रित बैठक मुंबईत घेऊन विलिनीकरण करायचे असा निर्णय झालेला होता, असा दावा शरद पवार गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना केला. 

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरणाबाबत दोन्ही गटांच्या बैठका झाल्या होत्या आणि स्वत: अजित पवार यांनी महापालिकांच्या निवडणुकीनंतर विलिनीकरण करूयात असे म्हटले असल्याचा दावा केला आहे. नंतर जिल्हा परिषद निवडणूक आली तेव्हा ते राहिले पण पुन्हा विलिनीकरणाबाबत दोन्ही बाजूंच्या नेत्यांची चर्चा झालेली होती आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर विलिनीकरण करण्याचे ठरले होते, असे शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे यांच्या विधानाचा अर्थ असा घेतला जात आहे, की विलिनीकरण ही अजितदादांची इच्छा होती हे सांगून ते अजित पवार गटाला विलिनीकरण लवकरात लवकर करण्याची एकप्रकारे गळ घालत आहेत. 

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मात्र तूर्तास विलिनीकरणाऐवजी अजित पवार यांच्या निधनानंतरच्या परिस्थितीत पक्षाची घडी बसविणे आणि सरकारमधील आपला सहभाग यावरच लक्ष केंद्रित केले असल्याचे एकूणच हालचालींवरून दिसत आहे. 

चर्चा नंतर करू : तटकरे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांना सांगितले की, विलिनीकरणाबाबत माझी आमच्या नेत्यांसोबत चर्चा झालेली नाही. आज आमच्यासमोर प्रश्न आहे तो विधिमंडळ पक्षनेता निवडणे. याच गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे  म्हणाले, की आम्ही आज दु:खद वातावरणात आहोत. सर्व विषयांची चर्चा ही नंतर होईल. 

भाजपची भूमिका काय? राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येण्यासंदर्भात भाजपची भूमिका महत्त्वाची असेल. अजित पवार गटाकडे सुनील तटकरे हे एकमेव लोकसभा सदस्य आहेत. शरद पवार गटाकडे मात्र आठ खासदार आहेत. उद्या दोन्ही पक्ष एकत्र येऊन एनडीएसोबत गेले तर भाजपला केंद्र सरकारमध्ये त्याचा फायदा होईल. आज नितीशकुमार यांच्या जनता दलाचा जो दबाव काही बाबतीत मानावा लागतो तो मानण्याचे दडपण नसेल.

विलीनीकरणात अडचण काय?विलीनीकरण केले तर शरद पवार गटाच्या नेत्यांना केंद्रीय वा राज्य मंत्रिमंडळात कसे सामावून घ्यायचे हा मोठा प्रश्न असेल. महाराष्ट्रात अजित पवार यांच्या व्यतिरिक्त  एकच मंत्रिपद रिक्त आहे आणि ते भाजपच्या कोट्यातील आहे. शरद पवार गटातील तीन-चार जणांना मंत्रिपद द्यायचे तर अजित पवार गटातील काही मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे लागतील. तसे केले तर नाराजी पसरेल, असे अजित पवार गटाला वाटते. विलिनीकरणाबाबत अजित पवार गट उत्सुक नसण्याचे ते कारण मानले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Differing Views on Merger Within NCP; Pawar Faction Eager?

Web Summary : NCP factions differ on merger. Ajit Pawar's group shows reluctance, prioritizing party stability after recent events. Sharad Pawar's group hopes for unity, but faces challenges in accommodating leaders post-merger, especially regarding ministerial positions, creating internal resistance within the Ajit Pawar faction.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार