नाशिकमध्ये डिझेलची पाईपलाईन फुटली, हजारो लिटर डिझेल वाया
By Admin | Updated: January 27, 2017 16:41 IST2017-01-27T16:40:06+5:302017-01-27T16:41:47+5:30
नाशिकमध्ये पांढुर्लीजवळ डिझेलची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर डिझेल वाया गेले आहे.

नाशिकमध्ये डिझेलची पाईपलाईन फुटली, हजारो लिटर डिझेल वाया
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 27 - पांढुर्लीजवळ डिझेलची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर डिझेल वाया गेले आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईहून मनमाडकडे जाणारी डिझेल पाईपलाईन फुटली आहे.
अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जमिनीचे सपाटीकरण सुरू असताना पाईपलाईन फुटल्याची माहिती समोर आली असली तरी हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे, याची चौकशी सुरू आहे.