डिझेल टाकीचा स्फोट

By Admin | Updated: May 10, 2017 02:39 IST2017-05-10T02:39:42+5:302017-05-10T02:39:42+5:30

रे रोडमध्ये क्लीन-अप गाडीच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना डिझेल टाकीचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

Diesel explosion | डिझेल टाकीचा स्फोट

डिझेल टाकीचा स्फोट

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रे रोडमध्ये क्लीन-अप गाडीच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना डिझेल टाकीचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यात वेल्डर अब्दुला रेहमानचा (२५) मृत्यू झाला असून, गाडीचा क्लीनर सिराज अहमद (२५) गंभीर जखमी झाला आहे.
रे रोड येथील बॅरिस्टर नाथ पै रोडवर अहमद हा कचरा वाहतूक गाडी दुरुस्तीसाठी रेहमानकडे घेऊन आला होता. मंगळवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास रहेमानने रस्त्याच्या कडेलाच गाडीच्या वेल्डिंगचे काम सुरू केले. त्याच दरम्यान डिझेल टाकीचा स्फोट झाला. यात रेहमानचा मृत्यू झाला. अहमद ८५ टक्के भाजला असून, त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वेल्डिंग सुरू असताना त्याची ठिणगी डिझेल टाकीकडे उडाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप उगले यांनी सांगितले.

Web Title: Diesel explosion