सैन्यातील जवानाचे उपचारा दरम्यान निधन

By Admin | Updated: April 3, 2017 20:56 IST2017-04-03T20:55:34+5:302017-04-03T20:56:33+5:30

भडगाव तालुक्यातील यशवंत नगर येथील विवेक साहेबराव पाटील (वय 21) हा तरूण बेळगाव प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरु असतानाच

Died during the treatment of army personnel | सैन्यातील जवानाचे उपचारा दरम्यान निधन

सैन्यातील जवानाचे उपचारा दरम्यान निधन

>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 3 - भडगाव तालुक्यातील यशवंत नगर येथील विवेक साहेबराव पाटील ( वय 21) हा तरूण बेळगाव प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरु असतानाच अचानक चक्कर येवून खाली कोसळला होता. त्यांच्यावर बेळगाव येथे उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचे आज  सकाळी निधन झाले.
 
विवेक हा घरातील हुशार व गुणी मुलगा होता. त्याची सैन्यातच भरती होण्याची इच्छा होती, ती पूर्णही झाली, मात्र प्रशिक्षण काळातच त्याच्यावर काळाने घाला घातला व त्याचे निधन झाले.  विवेकच्या निधनाने तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
 
त्यांच्या पार्थिवावर उदया दि. 4 रोजी सकाळी 9 वाजता भडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील भाऊ असा परिवार आहे. तो येथील श्री दत्त पान सेंटरचे प्रल्हाद तान्हीराम पाटील यांचा पुतण्या होता. वडीलांचाही चहाचा व्यवसाय असून घरची साधारण परीस्थिती आहे. मुलाच्या सैन्य सेवेने परिवाराला सुगीचे दिवस येणार होते. 
 
विवेक 21 डिसेंबर 2016 ला सैन्यात भरती झाला होता , बेळगाव येथे त्याचे गेल्या चार महिन्यांपासून प्रशिक्षण सुरु होते. विवेकच्या लहान भावाला देशसेवेसाठी सैन्यात पाठवून विवेकची इच्छा पूर्ण करणार असल्याची इच्छा परिवाराने व्यक्त केली आहे.

Web Title: Died during the treatment of army personnel