महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील हजारो कंत्राटदारांची बिले थकलेली आहेत. नव्या विकासकामासाठी राज्याकडे पैसे नाहीत. दिवाळीचा आनंदाचा शिधा रद्द करण्याची वेळ आलेली असताना आजपासून या योजनेचा १६ वा हप्ता लाभार्थी महिलांच्य खात्यावर वळता केला जाणार आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती एस. तटकरे यांनी ३ नोव्हेंबरला याची माहिती दिली. ऑक्टोबर महिन्याचा हा हप्ता असणार आहे. तसेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार आहे. गेल्या महिनाभरापासून ई-केवायसी करताना मोठ्या अडचणी येत होत्या. सर्व्हर डाऊन, कधी ओटीपी आला नाही, ओटीपी आला तर तो चुकीचा असल्याचे सांगितले जात होते. यामुळे महिला मेटाकुटीला आल्या होत्या. दिवाळीत सारे सणांमध्ये व्यस्त असताना काहीसा दिलासा मिळाला होता. आता अवघे १४-१५ दिवस राहिले असून तटकरे यांनी लवकर ई केवायसी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.
खात्यात येणार ₹१,५००या योजनेअंतर्गत, राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० ची आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यात (DBT द्वारे) पाठवली जाते. सप्टेंबर महिन्याचा हप्ता १० ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता. दिवाळीपूर्वी हप्ता जमा होण्याची अपेक्षा होती, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तो होऊ शकला नाही. मात्र, आता ४ नोव्हेंबरपासून पैसे येण्यास सुरुवात होईल.
₹१,५०० साठी KYC अनिवार्य! मुदत १८ नोव्हेंबर
ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२५ आहे. ज्या महिलांनी अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार नाही. पात्र महिलांनी त्वरित 'ladakibahin.maharashtra.gov.in' पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी.
Web Summary : Ladki Bahin Yojana's 16th installment releases today. Women must complete eKYC by November 18th to receive future payments of ₹1,500. Technical issues persist; complete KYC at ladakibahin.maharashtra.gov.in.
Web Summary : लाडकी बहीण योजना की 16वीं किस्त आज जारी। ₹1,500 की भविष्य की किस्तों के लिए 18 नवंबर तक eKYC पूरा करें। तकनीकी समस्याएँ बनी हुई हैं; ladakibahin.maharashtra.gov.in पर KYC पूरा करें।