शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

पूजा खेडकरने नाव बदलून परीक्षा दिली का? UPSC ने तपासली 15 हजार उमेदवारांची कागदपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 17:56 IST

आज UPSC ने पूजा खेडकरला दोषी ठरवत तिची निवड रद्द केली आहे.

Pooja Khedkar News :केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरवर (Pooja Khedkar) मोठी कारवाई केली आहे. UPSC आयोगाने पूजाची उमेदवारी रद्द केली आहे. तसेच, तिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पूजावर कारवाई करण्यापूर्वी आयोगाने मागील 15 वर्षांचे रेकॉर्ड तपासले. 

15 हजार उमेदवारांचे रेकॉर्ड तपासलेयूपीएससीने यापूर्वीच पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि कारवाईचे संकेत दिले होते. आपल्या नोटीसमध्ये पूजा खेडकर यांची नागरी सेवा परीक्षा-2022 ची उमेदवारी का रद्द करण्यात येऊ नये, अशी विचारणा आयोगाने केली होती. याप्रकरणी यूपीएससीने एफआयआरही दाखल केला होता. दरम्यान, पूजा यांनी यापूर्वी बनावट कागदपत्रांद्वारे परीक्षा दिली होती का, हे तपासण्यासाठी UPSC ने 2009 ते 2023 पर्यंत पास झालेल्या 15,000 हून अधिक उमेदवारांचा डेटा तपासला. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आयोग आपली निवड प्रक्रिया आणखी मजबूत करणार आहे. 

खोट्या प्रमाणपत्रावर यूपीएससीने काय म्हटले?पूजा खेडकरची खोटी प्रमाणपत्रे (विशेषत: OBC आणि PwBD श्रेणी) सादर करण्याच्या प्रश्नावर UPSC ने स्पष्ट केले की, ते केवळ प्रमाणपत्रांची प्राथमिक छाननी करतात. हे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने दिले आहे की, नाही हे तपासले जाते. प्रमाणपत्राच्या तारखेसारख्या केवळ मूलभूत गोष्टी तपासल्या जातात. उमेदवारांनी सादर केलेल्या हजारो प्रमाणपत्रांची सत्यता पडताळण्याचे अधिकार किंवा माध्यम आयोगाकडे नाही.

पूजा खेडकर चर्चेत कधी आली?युपीएससी पास केल्यानंतर सुरुवातीच्या प्रशिक्षणासाठी पूजा खेडकर पुण्यात आली. पुण्यात आल्यानंतर तिने स्वतंत्र केबिन आणि कर्मचाऱ्यांची मागणी केली. याशिवाय, तिने आपल्या खासगी ऑडी वाहनावर महाराष्ट्र सरकार लिहून, त्यावर अंबर दीवाही लावला होता, ज्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. यानंतर तात्काळ तिची पुण्यातून वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. पण, हळुहळू तिच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत गेल्या. आज अखेर आयोगाने तिची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाPuneपुणे