शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा हिंसाचाराला सरकारचे पाठबळ होते का? मुंडेंचा सवाल, विरोधकांचा गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 04:14 IST

मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यामुळे कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झालेला असताना राज्य सरकार त्यांना अटक करू शकले नाही.

मुंबई : मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यामुळे कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झालेला असताना राज्य सरकार त्यांना अटक करू शकले नाही. त्यांच्यापुढे सरकार हतबल झाले असून कोरेगाव-भीमाच्या घटनेला सरकारचे पाठबळ होते का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला.कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली होती. याप्रकरणी सभागृहात नियम २८९ अन्वये चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली. दोषींना अटक करावी या मागणीसाठी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज सुरुवातीला वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.१ जानेवारीपूर्वीच काही संघटनांनी कोरेगाव भीमा परिसरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. याची कल्पना असूनही पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला नाही, असा आरोप मुंडे यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार जयदेव गायकवाड यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. या घटनेला दोन महिने उलटूनही हल्लेखोर आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक झाली नसल्याचे गायकवाड म्हणाले. यावेळी काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, भाई जगताप , जोगेंद्र कवाडे यांनीही हिंसाचारामागील गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.त्यामुळे यावर आता काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेली स्थगन प्रस्तावाची सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावली. याशिवाय विरोधकांच्या अन्य तीन स्थगन प्रस्तावाच्या सूचना दालनातच नाकारल्याची घोषणा सभापतींनी केली. मात्र, स्थगन प्रस्तावावर बोलू देण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने सभापतींनी दिवसरभराचेच कामकाज तहकूब केले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBhima-koregaonभीमा-कोरेगाव