दोस्तीप्रकरणी अहवालाअंती कठोर कारवाई - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 04:24 AM2018-07-17T04:24:50+5:302018-07-17T04:24:58+5:30

मुंबईतील अँटॉप हिल येथील लॉईड्स इस्टेटच्या आवारात जमीन खचण्याच्या दुर्घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी सुरू आहे.

Dictatorial report and strict action - Chief Minister | दोस्तीप्रकरणी अहवालाअंती कठोर कारवाई - मुख्यमंत्री

दोस्तीप्रकरणी अहवालाअंती कठोर कारवाई - मुख्यमंत्री

Next

नागपूर : मुंबईतील अँटॉप हिल येथील लॉईड्स इस्टेटच्या आवारात जमीन खचण्याच्या दुर्घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एका चौकशीची घोषणा करण्याची आवश्यकता नाही. न्यायालयाच्या देखरेखीखालील चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर फौजदारी आणि आवश्यक ती कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिले.
अँटॉप हिल परिसरात दोस्ती रिअ‍ॅलिटी या विकासकाडून ५० मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीचा पाया खणताना शेजारच्या लॉईड्स इस्टेट या बहुमजली इमारतीच्या आवारातील जमीन खचून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली.

Web Title: Dictatorial report and strict action - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.