फ ॉरेन्सिक लॅबला पाठवणार डायरीची पाने

By Admin | Updated: October 9, 2015 01:07 IST2015-10-09T01:07:02+5:302015-10-09T01:07:02+5:30

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली डायरीची सुमारे २० पानी सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यात बांधकामांबाबत बदलणाऱ्या शासकीय

Diary pages to be sent to forensic labs | फ ॉरेन्सिक लॅबला पाठवणार डायरीची पाने

फ ॉरेन्सिक लॅबला पाठवणार डायरीची पाने

ठाणे : बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली डायरीची सुमारे २० पानी सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यात बांधकामांबाबत बदलणाऱ्या शासकीय नियमांना कंटाळल्याचे तसेच काही राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे नमूद आहेत. मात्र, ती नावे त्यांनीच खोडल्याने आणि एकंदरीत सुसाइड नोटमधील खाडाखोड लक्षात घेता ती नोट पुण्यातील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे राजकीय पुढारी आणि शासकीय यंत्रणेमधील ते अधिकारी कोण, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
गुरुवारी सकाळी परमार यांच्यावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. याचदरम्यान परमार यांच्या सासऱ्यांनी महापालिकेच्या कामकाजावर टीका केली. तसेच ठामपातील एक गोल्डन गँग यामागे असल्याचा आरोप करत सुसाइड नोट लोकांसमोर उघड करावी. त्यामुळे सत्य बाहेर येईल, असे त्यांनी म्हटले आहे. आरोप पडताळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. एमसीएचआयचे माजी अध्यक्ष सूरज परमार यांनी ब्ल्यू रूफ या कार्यालयात स्वत:वर गोळी झाडून घेतली होती.

कुटुंबीयांची काळजी!
नेत्यांची नावे लिहून नंतर खोडली आहेत. कु टुंबीयांना त्रास देतील, अशी भीती असल्याने ती खोडल्याचे म्हटले आहे. मनाविरोधात काहींना पैसे दिल्याचे म्हटल्याची माहिती पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांनी दिली. कॉसमॉस कंपनीतून
३० कामगारांना ४ महिन्यांचा पगार व प्रत्येकी ५ हजारांचा बोनस देऊन कमी केले. दिवाळीनंतर ५० जणांना ते कामावरून कमी करणार होते.

Web Title: Diary pages to be sent to forensic labs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.