अंधेरीत नाइट क्लबमध्ये डायमंड ब्रोकरचा गोळीबार
By Admin | Updated: May 31, 2014 07:03 IST2014-05-31T05:30:05+5:302014-05-31T07:03:31+5:30
अंधेरीतल्या एस्केप नाइट क्लबमध्ये एका डायमंड ब्रोकरने गोळीबार केला. त्यात क्लबचा मॅनेजर जखमी झाला. ही घटना काल रात्री १२ वाजता घडली

अंधेरीत नाइट क्लबमध्ये डायमंड ब्रोकरचा गोळीबार
मुंबई : अंधेरीतल्या एस्केप नाइट क्लबमध्ये एका डायमंड ब्रोकरने गोळीबार केला. त्यात क्लबचा मॅनेजर जखमी झाला. ही घटना काल रात्री १२ वाजता घडली. विक्रमकुमार चिकन्ना कल्लोडी (वय ५०) असे डायमंड ब्रोकरचे नाव असून आंबोली पोलिसांनी त्याला गजाआड केले. लोखंडवाला संकुलात कुटुंबीयांसह राहणारा विक्रमकुमार काल एस्केप क्लबमध्ये उपस्थित होता. रात्री १२ च्या सुमारास दारूच्या नशेत विक्रमने क्लबमधील एका तरुणीला छेडले. तरुणीने विक्रमची तक्रार क्लबचे मॅनेजर हितेंद्र कुमार झा यांच्याकडे केली. झा यांनी विक्रमला क्लबच्या आॅफिसमध्ये बोलवून जाब विचारला. तेव्हा दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यात विक्रमने आपल्याकडील रिव्हॉल्व्हर काढले आणि झा यांच्या दिशेने गोळी झाडली. या हल्ल्यातून झा बचावले. गोळी त्यांना चाटून गेली. जखमी झा यांना तत्काळ नजीकच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर मेढे यांनी दिली.