मुंबईतही घडणार ‘संवाद’
By Admin | Updated: July 30, 2014 00:31 IST2014-07-30T00:31:03+5:302014-07-30T00:31:03+5:30
एचआयव्हीची वाटणारी भिती आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक दडपण दूर करण्यासाठी काम करणारी ‘संवाद’ हेल्पलाईन आता मुंबईतही जोमाने काम करताना दिसणार आहे.

मुंबईतही घडणार ‘संवाद’
मुंबई : असुरक्षित संभोग केल्यानंतर एचआयव्हीची वाटणारी भिती आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक दडपण दूर करण्यासाठी काम करणारी ‘संवाद’ हेल्पलाईन आता मुंबईतही जोमाने काम करताना दिसणार आहे. मुक्ता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या या हेल्पलाईनने याआधी पुणो, सोलापूर जिल्ह्यांसह बिहारसारख्या राज्यात लाखो लोकांचे समुपदेशन केले आहे.
गेल्या 9 वर्षात एचआयव्ही एड्सबाबत विविध प्रश्नांनी ग्रासलेल्या राज्यातील 1 लाख 35 हजार 791 जणांच्या समुपदेशनाचे काम संस्थेने केले आहे. तर बिहारमध्येही सुमारे 42 हजार नागरिकांनी या हेल्पलाईवर संपर्क साधल्याचे संस्थेने सांगितले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन्ही भाषेत हेल्पलाईनवरील समुपदेशक संपर्क साधणा:यांचे समुपदेशन करतात.
गेल्या सहा महिन्यांत मुंबईतील 6क्क् लोकांनी एचआयव्ही आणि एड्सबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाईनवर कॉल केले. त्यामुळे आता मुंबईतही तळागाळातील लोकांर्पयत एड्स आणि एचआयव्हीबाबत जनजागृती करण्यासाठी संस्था काम सुरू करत असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मधु ओस्वाल-ठक्कर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, हेल्पलाईनवर वयोमानानुसार प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी आणि नुकत्याच लग्न झालेल्या तरुणांचे कॉल येण्याचे प्रमाण अधिक आहे. भावनेच्या आहारी किंवा नशेत असताना संभोग केल्यानंतर मनात भिती निर्माण होते. आपल्याला एचआयव्हीची लागण तर झाली नाही ना? म्हणून ही मंडळी शासनाच्या रूग्णालयांत जाऊन वेगवेगळ्य़ा चाचण्याही करतात. मात्र मनाची खात्री पटलेली नसते. अशा तरुणांचे समुपदेशन हेल्पलाईन करते. शिवाय थेट कॉल केलेल्या तरुणांनाही शासनाच्या नेमक्या कोणत्या विभागात कोणती चाचणी करण्याची गरज आहे, याचे मार्गदर्शन केले जाते.
पुण्यात शासकीय रूग्णालये, शाळा, महाविद्यालय याठिकाणी पोस्टर लावून, शिबिर घेऊन आणि पथनाटय़ाच्या माध्यमातून संस्था जनजागृती करत आहे. त्याठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी, आशा वर्कर आणि विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृती केली. याच पद्धतीचा अवलंब करून मुंबईतही जनजागृती केली जाईल, असे संस्थेने सांगितले. (प्रतिनिधी)
च्2क्13-14 या आर्थिक वर्षात राज्यातून 25 ते 4क् वयोगटातील तरुणांनी सर्वाधिक कॉल केल्याचे संस्थेने सांगितले. तरुणांचे कॉल करण्याचे प्रमाण हे 83 टक्के इतके आहे. 2क्क्5-क्6 साली हे प्रमाण 22 टक्के इतके होते. देशातील एचआयव्ही झालेल्यांची संख्या 24 लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यात तरुणांची संख्या 31 टक्के इतकी आहे.
..तर एक मिस्ड कॉल द्या
च्कोणत्याही नागरिकाच्या मनात एचआयव्ही किंवा एड्सबाबत शंका असेल, तर त्यांनी हेल्पलाईनच्या 9527665566 या टोल फ्री क्रमांकावर एक मिस्ड कॉल देण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. 24 तासांच्या आत संस्थेचे समुपदेशक मिस्ड कॉल आलेल्या क्रमांकावर कॉल करून शंकेचे निराकरण करतात.