शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

राज्यात दिवसभरात २,४८७ रुग्णांचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 06:52 IST

राज्यात सध्या ३ हजार १५७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून रविवारी एकूण १८ हजार ४९० पथकांनी ७०.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात रविवारी २ हजार ४८७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या ६७ हजार ६५५ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ८९ मृत्यू झाले असून बळींचा आकडा २ हजार २८६ झाला आहे. राज्यात सध्या ३६ हजार ३१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून १ हजार २४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या २९ हजार ३२९ आहे. एकट्या मुंबईत दिवसभरात १ हजार २४४ रुग्णांची नोंद झाली असून ५२ जणांचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्णसंख्या ३९,६८६, तर बळींचा आकडा १२७९ वर पोहोचला आहे.

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.७ दिवस होता, आता १७.५ झाला आहे. तर देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्याचा मृत्यूदर ३.३७ टक्के असून बरे होण्याचे प्रमाण वाढत असून हे ४३.३५ टक्के आहे. राज्यात रविवारी नोंद झालेल्या ८९ मृत्यूंमध्ये मुंबईतील ५२, नवी मुंबई ९, ठाणे ५, कल्याण-डोंबिवली ४, मालेगाव ६, पुणे ९, सोलापूर २, उस्मानाबाद १ आणि यवतमाळ १ या रुग्णांचा समावेश आहे. या ८९ मृत्यूंमध्ये ४६ पुरुष तर ४३ महिला आहेत. ५६ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार १०० लोक घरगुती अलगीकरणात आहेत, तर संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून त्यात ३४ हजार ४८० लोक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ६२ हजार १७६ नमुन्यांपैकी ६७ हजार ६५५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात सध्या ३ हजार १५७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून रविवारी एकूण १८ हजार ४९० पथकांनी ७०.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.ले आहे.रशिया, भारतात नवे रुग्ण अधिक२४ तासांत जगात कोरोनाचे जे ५० हजारांवर रुग्ण आढळले, त्यात रशिया (९३६३) व भारत (८ हजार) या दोन देशांतील १७ हजारांहून अधिक आहेत. त्या खालोखाल ब्राझील (३५४५) व पाकिस्तान (३०३९) यांचा क्रमांक आहे. जगातील रुग्णांची संख्या आता ६२ लाखांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा ३ लाख ७२ हजारांवर गेला आहे. बरे झालेल्यांची संख्या २७ लाख ६३ हजार झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस