धुळे पोलीस रडारवर!

By Admin | Updated: September 1, 2015 01:18 IST2015-09-01T01:18:08+5:302015-09-01T01:18:08+5:30

धुळे जिल्ह्यातील जुगार अड्ड्यांवर सलग तिसऱ्यांदा जिल्ह्याबाहेरच्या पथकाने कारवाई केल्याने निष्क्रिय धुळे पोलीस आता विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या रडारवर आले आहेत

Dhule police on radar! | धुळे पोलीस रडारवर!

धुळे पोलीस रडारवर!

जळगाव : धुळे जिल्ह्यातील जुगार अड्ड्यांवर सलग तिसऱ्यांदा जिल्ह्याबाहेरच्या पथकाने कारवाई केल्याने निष्क्रिय धुळे पोलीस आता विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या रडारवर आले आहेत. धुळे पोलिसांवर त्यांनी कारवाईचे अस्त्र उगारले आहे. पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांच्यासह संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
धुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयजितसिंग यांच्याकडे तक्रारी आल्या. त्यांची दखल घेत त्यांनी शेजारच्या जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस पथकांकरवी धुळे जिल्ह्यातील जुगार अड्ड्यांवर कारवायांचे सत्र सुरू केले आहे.

Web Title: Dhule police on radar!