शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

dhule Municipal Election updates: धुळ्यात पैसे वाटपाच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 10:22 IST

धुळे/अहमदनगर : महापालिका निवडणुकीत रविवारी धुळ्यात ६० टक्के तर नगरमध्ये ७० टक्के मतदान झाले. दुपारनंतर दोन्ही ठिकाणी मतदानासाठी उशिरापर्यंत मोठ्या ...

धुळे/अहमदनगर : महापालिका निवडणुकीत रविवारी धुळ्यात ६० टक्के तर नगरमध्ये ७० टक्के मतदान झाले. दुपारनंतर दोन्ही ठिकाणी मतदानासाठी उशिरापर्यंत मोठ्या रांगा लागल्या होत्या. सोमवारी दोन्ही ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरुवात होऊन दुपारी बारानंतर निकाल हाती लागण्यास सुरुवात होईल. धुळ्यात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाल्याचा आरोप विविध पक्षांनी केला़. नगर व धुळ्यात त्रिशंकू स्थिती राहील, अशी शक्यता आहे.धुळ्यात दुपारी ४ वाजेनंतर साक्री रोडवरील मोगलाई परिसरातील एका घरात पैसेवाटप होत असल्याची माहिती मिळाल्याने आमदार अनिल गोटे यांनी त्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर तातडीने पोलीस, भरारी पथके दाखल झाली. काही वेळाने त्यांनी आंदोलन मागे घेतले. तर काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी गोंदूर रोडवरील एस. आर.  पाटील शाळा येथील मतदान केंद्राच्या परिसरात पैसे वाटप होत असल्याची तक्रार महापालिका व पोलीस प्रशासनाकडे केली.केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व त्यांचे चिरंजीव डॉ. राहुल भामरे, अनिल गोटे व त्यांच्या पत्नी हेमा गोटे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले आदींनी मतदान केले. धुळ्यात ७४ (१ बिनविरोध) जागांसाठी तर ६८ जागांसाठी मतदान झाले.नगरला एकाला अटकनगरला तारकपूर भागातील सेंट विवेकानंद हायस्कूलमध्ये पैसे वाटप करताना विशेष पथकाने आकाश औटी या युवकाला अटक केली. मतदान केंद्रावर मोबाईल बाळगल्याच्या कारणावरून झालेल्या वादात पत्रकार संदीप रोडे यांना पोलीस निरीक्षकांनी मारहाण केली. बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या एका महिलेलाही पोलिसांनी अटक केली. राजकीय वादातून शिवसैनिकावर जीवघेणा हल्ला झाल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.>छिंदमच्या भावाने केली मतदान यंत्राची पूजाछत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम नगर महापालिका निवडणुकीत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मतदानाच्या दिवशी छिंदमच्या भावाने रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या मतदान केंद्र क्रमांक १५८ मध्ये जाऊन चक्क ईव्हीएम मशीनची पूजा केली. याबाबत मतदान प्रक्रिया संपल्यानंतर प्रशासनाच्या वतीने पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे.>नगरमध्ये बाजी कोण मारणार?‘लोकमत’ने केलेल्या एका पाहणीनुसार भाजपा (१८ ते २०), शिवसेना (१९ ते २१), राष्ट्रवादी (२१ ते २३), काँग्रेस (३ ते ४), इतर (३ ते ४) अशी स्थिती राहील. महापालिकेत सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते.

टॅग्स :Dhule Municipal Election 2018धुळे महापालिका निवडणूकahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका