ढवळे ट्रस्टचे हॉमीओपॅथी ग्रामीण रूग्णालय अद्वितीय
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:06+5:302016-06-07T07:43:06+5:30
ढवळे ट्रस्टच्या हॉमीओपॅथी ग्रामीण रूग्णालयासारखे रुग्णालय मी आजवर कुठे पाहिले नसल्याचे प्रतिपादन केंद्रिय मंत्री, आयुष मंत्रालय शीपाद नाईक यांनी केले.

ढवळे ट्रस्टचे हॉमीओपॅथी ग्रामीण रूग्णालय अद्वितीय
पालघर/नंडोरे : दीड वर्षाच्या माझ्या कारकिर्दित मी बरीच हॉमीओपॅथी महाविद्यालयीन रुग्णालये बघितली आहेत पण ढवळे ट्रस्टच्या हॉमीओपॅथी ग्रामीण रूग्णालयासारखे रुग्णालय मी आजवर कुठे पाहिले नसल्याचे प्रतिपादन केंद्रिय मंत्री, आयुष मंत्रालय शीपाद नाईक यांनी येथील ढवळे मेमोरिअलच्या सेंटर आॅफ एक्सलन्स इन हॉमीओपॅथी विंगच्या उद्घाटन प्रसंगी केले.
पुढे आपल्या भाषणादरम्यान नाईक यांनी संस्था हि दात्यांच्या आधारावर चालते व दाते संस्थेचा महत्वाचा अंग आहे. संस्थेला विश्वासाचा धागा मजबुत असण्यासाठी जो विश्वास लागाते. त्या विश्वासास ढवळे ट्रस्ट पात्र आहे असेही स्पष्ट केले. आयुष मंत्रालय ही सेवा पुढे नेण्यासाठी कटिबध्द आहे व राहील भारतातील प्रत्येक गावापासून प्रत्येक राज्यापर्यंत ते देशभर हॉमीओपॅथी चिकित्सक कार्यरत ठेवण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतातील हजारो वर्षापूर्वी चिकित्सक पध्दतीला नवसंजीवनी मिळावी यासाठी आपण व आयुष मंत्रालय प्रयत्न करणार असल्याचे व त्यासाठी सहकार्य ही मिळत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या या भागाचे माजी खासदार तसेच उत्तर प्रदेशचे राज्यपाल व पालघरशी नाळ जोडून असलेल्या रामभाऊ नाईक यांनी उपस्थितांना ढवळे यांच्या समाजकार्याची व रूग्णसेवेची उदाहरणे दिली. त्यांचा आदर्श डोळ््यासमोर ठेवण्याचे आवाहन केले.
दात्यांनी दिलेल्या देणगीचा वापर देणगी दारांनीही कल्पना नसेल अशा पध्दतीने येग्य व चांगल्या प्रकारे वापर करून हे विश्व निर्माण केल्याचे कौतुकही रामभाऊनी केले.
कार्यक्रमावेळी अरूण म्हस्के, रामजी सिंग, माजी मंत्री राजेंद्र गावीत, जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले, माजी आमदार सामाजिक कार्यकर्त नवनीत भाई शाह, प्रशांत पाटील, भाजप कार्यकर्ते, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना सेंटर आॅफ इक्सलन्सची माहिती कुमार ढवळे यांनी दिली. डॉ. अनुप निगवेकर यांनी आभार प्रदर्शन करत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
(वार्ताहर)
>या सेंटरमध्ये आधुनिक पल्मनॉलजी, आयुष पल्मनरी फंक्शन, न्युरो मस्क्युलर मशिन अशा अत्यंत दुर्मिळ व महागड्या सुविधा आहेत.
कार्यक्रमादरम्यान जिल्हयाचे खासदार अॅड. वनगा यांनी आपले विचार मांडले.
बरोबरीने ढवळे ट्रस्ट आपला नावलौकीक देशभर गाजवत असल्याचा अभिमानही या वेळी वक्त्यांनी व्यक्त केला.