शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन: नॅशनल गार्ड्सवर भररस्त्यात गोळीबार करणारा 'तो' तरूण कोण? महत्त्वाची माहिती समोर
2
नोकरी सोडली किंवा काढलं, आता २ दिवसांत होणार फुल अँड फायनल सेटलमेंट! नव्या 'लेबर लॉ'नं बंदलला खेळ
3
कोट्यवधी कर्जदारांना RBI चा मोठा दिलासा! क्रेडिट स्कोअरबाबत मोठा निर्णय; कर्ज आणि EMI त्वरित होईल स्वस्त!
4
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती
5
Donald Trump: "खूप मोठी किंमत मोजावी लागेल" व्हाईट हाऊस जवळील गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले!
6
शेतकरी कर्जवसुलीस एक वर्षाची स्थगिती; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा
7
Mumbai Video: वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशि‍लात, व्हिडीओ व्हायरल
8
देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट, कोट्यवधीमध्ये झाली विक्री, एवढ्या किमतीत आली असती एक आलिशान कार
9
आईच्या नावे पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये महिन्याला गुंतवा ₹४०००; मॅच्युरिटीवर मिळेल लाखोंचा फंड, पैसाही सुरक्षित
10
चार-पाच लोकांमध्ये झाली होती 'सीक्रेट डील'; शिवकुमार यांचा माघार घेण्यास नकार, काँग्रेस काय करणार?
11
पुण्यात तीन लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; उद्धवसेनेचा आरोप
12
धर्मेंद्र यांची संपत्ती नको, फक्त 'ती' एक गोष्ट हवी; लेक अहाना देओलने व्यक्त केलेली इच्छा
13
Share Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी; Nifty वर्षभरानंतर नव्या उच्चांकाजवळ, बँक निफ्टीतही विक्रमी तेजी
14
आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, ४४ जणांचा मृत्यू... हाँगकाँगमध्ये गगनचुंबी इमारतीला आग (PHOTOS)
15
IND vs SA: गुवाहाटी कसोटी पराभवामुळे चाहते संतापले, गंभीरच्या तोंडावरच त्याला म्हणाले...
16
हर हर गंगे! 'तेरे इश्क मे'च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहोचले धनुष-क्रिती; गंगा आरतीही केली
17
आता पोलिसही सुरक्षित नाहीत, बनावट व्हिजिलेंस अधिकारी करत होते ट्रॅफिट पोलिसांकडून वसुली, अखेरीस...  
18
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
19
आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२५: व्यापार, धनलाभ आणि आरोग्य! आज तुमच्या राशीत काय आहे?
20
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसात ‘धवललक्ष्मी’ ने कापले ४५ किमी अंतर; सॅटेलाइट टॅगद्वारे कासवाचा अभ्यासकांकडून मागोवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 07:24 IST

डहाणूच्या सागरी कासव संक्रमण व उपचार केंद्रात तीन महिने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर या कासवाच्या पाठीला सॅटेलाईट टॅग लावण्यात आले.

अनिरुद्ध पाटील

बोर्डी : सॅटेलाईट टॅग लावलेले ‘धवललक्ष्मी’ या ऑलिव्ह रिडले मादी सागरी कासवाला गुरुवारी (दि. २०) डहाणूच्या समुद्रात सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या सागरी जलविहाराची माहिती वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि कांदळवन विभागाकडून घेतली जात आहे. त्यानुसार २० ते २५ नोव्हेंबर या पाच दिवसात धवललक्ष्मीने तब्बल ४५ किमीचे अंतर कापले आहेत. हा समाधानकारक प्रवास असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

तीन महिने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर प्रवास सुरूडहाणूच्या सागरी कासव संक्रमण व उपचार केंद्रात तीन महिने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर या कासवाच्या पाठीला सॅटेलाईट टॅग लावण्यात आले. २० नोव्हेंबरला दुपारी एकच्या सुमारास धाकटी डहाणू खाडीतून ६ नॉटीकल खोल समुद्रात मादी कासवाला सोडले होते. तिथून २५ किलोमीटर खोल समुद्रात  या कासवाने प्रवास केल्याचे २१ नोव्हेंबरच्या सकाळी सॅटेलाइट सिग्नलद्वारे समजले. त्यानंतर २५ नोव्हेंबरला शेवटचा सिग्नल प्राप्त झाला. त्यानुसार मागील स्थळापासून २० किलोमीटर उत्तरेकडे पालघर-गुजरात सीमेलगत त्याचा वावर आढळला. 

यापूर्वीही कासवावर असे प्रयोग केले होते कासवाची नवीन त्वचा आल्यावर जुन्या त्वचेसह हे डिव्हाईस निघून जाते, त्यामुळे त्याच्या शरीरधर्मावर लावलेल्या टॅगचा कालावधी अवलंबून असतो. २०१०-११ला ओडिसा येथे कासवावर असे टॅग लावले, ते सुमारे दोन वर्षे चालले. त्या कासवाने बंगालची खाडी आणि श्रीलंकेच्या समुद्रात शिरकाव केला होता. २०२२-२३ ला गुहागर येथे असे टॅग लावलेल्या कासवाची तामिळनाडू, श्रीलंका या प्रवासाची नोंद झाली होती. वेलास येथील कासव कर्नाटक, केरळ, तसेच गुजरातच्या समुद्रात भटकंती करताना आढळले होते. विणी हंगामात किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या कासवांवर हा प्रयोग होता.

खुल्या समुद्रातील पुनर्वसन, जीवनक्रम कळणारसॅटेलाइट टॅग लावलेले कासव श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागी आल्यानंतरच सिग्नल प्राप्त होतात. दिवसातून दोन ते तीन वेळाच हे सिग्नल मिळतात, त्यावेळी कासव पृष्ठभागावर नसल्यास मात्र हा योग जुळून यायची वाट पाहावी लागते, असे तज्ज्ञ सांगतात. जखमी कासवावरील उपचारानंतर बरे झाल्यावर हे टॅग लावण्यात आलेला देशातील पहिला प्रयोग आहे. उपचारानंतर कासवाचे खुल्या समुद्रातील पुनर्वसन, त्याचा जीवनक्रम, मार्गक्रमण केलेला भाग, अंतिम कालावधी, आदी माहिती प्राप्त होईल. या हाती घेतलेल्या उपक्रमाने कासवाच्या सागरी भ्रमंतीचा मागोवा अभ्यासासाठी होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhawalakshmi the Turtle Travels 45 km in 5 Days: Tracked by Satellite

Web Summary : Olive Ridley turtle 'Dhawalakshmi,' fitted with a satellite tag, traveled 45 km in five days after release. Experts monitor its journey to study rehabilitation, life cycle and migration patterns. This is the first such experiment in India.
टॅग्स :Researchसंशोधन