धारूर, परळीत अपघात; नऊ जखमी
By Admin | Updated: June 13, 2016 23:22 IST2016-06-13T23:18:45+5:302016-06-13T23:22:56+5:30
धारुर - गोपाळपूर रस्त्यावर एमएच२३/ई३९२४ व दुचाकी क्र. एमएच२३/३३२६ यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वारासह जीपमधील पाचजण जखमी झाले.

धारूर, परळीत अपघात; नऊ जखमी
धारुर/परळी: धारूर व परळी येथे सोमवारी दोन वेगवेगळ्या अपघातांत नऊजण जखमी झाले.
धारुर - गोपाळपूर रस्त्यावर एमएच२३/ई३९२४ व दुचाकी क्र. एमएच२३/३३२६ यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वारासह जीपमधील पाचजण जखमी झाले. सचिन सुभाष राठोड, प्रमोद राजाभाऊ तिडके, सरुबाई दत्तू तिडके, नंदूबाई हनुमंत तिडके, सुरेखा उत्रेश्वर मुंडे, चांगुणा दत्तात्रय मैंद यांचा जखमींत समावेश आहे. दोन्ही वाहने छोट्या पुलाजवळ पडली असून नुकसान झाले.
बैलगाडीवर दुचाकी आदळली
पांगरी (ता.परळी) शिवारात सोमवारी सायंकाळी बैलगाडीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. यात गाडीवानासह तिघेजण जखमी झाले. दुचाकीवरील विजयकुमार चाटे, बालाजी गुट्टे व गाडीवान तुळशीदास आरगडे अशी नावे आहेत. अंबाजोगाईतील स्वारातीत उपचार सुरु आहेत. (वार्ताहर)