धारावीत कारमध्ये सामूहिक बलात्कार?
By Admin | Updated: July 25, 2014 02:23 IST2014-07-25T02:23:55+5:302014-07-25T02:23:55+5:30
चालत्या कारमध्ये दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक तक्रार ठाणो जिल्हयात राहणा:या एका विधवा महिलेने धारावी पोलिसांकडे केली आहे.

धारावीत कारमध्ये सामूहिक बलात्कार?
मुंबई : चालत्या कारमध्ये दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक तक्रार ठाणो जिल्हयात राहणा:या एका विधवा महिलेने धारावी पोलिसांकडे केली आहे. मात्र या महिलेने दिलेला घटनाक्रम आणि तपशिलावरून पोलीस संभ्रमित झाले आहेत. तूर्तास पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
संबंधित महिला नालासोपारा येथे राहणारी असून गोरेगाव येथील एका खासगी कंपनीत टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करते. मंगळवारी ती कामावरून घरी गेली. नंतर पुन्हा खरेदीसाठी वांद्रयाला आली. खरेदी आटोपून वांद्रे रेल्वे स्थानक गाठण्यासाठी तिने रिक्षा पकडली. मात्र रिक्षाचालकाने या महिलेला स्थानकाऐवजी धारावीच्या टी जंक्शन येथे नेले. तेथे रिक्षा सोडून चालक पसार झाला. त्यामुळे दुस:या रिक्षाच्या प्रतीक्षेत असताना एक कार तिच्यासमोर येऊन थांबली. कारमध्ये एक ओळखीचा तरुण होता. त्याच्या सांगण्यावरून ती कारमध्ये बसली. मात्र थोडय़ा अंतरावर जाताच कारमधील दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असे या महिलेने पोलिसांना सांगितले. तसेच कधी अंधार असल्याने आरोपींचे चेहरे दिसले नाहीत तर कधी ओळखीचा तरूण दिसल्याने गाडीत बसले, असा विसंगत जबाब या महिलेने पोलिसांना दिला आहे. त्यामुळे तक्रारीबाबत पोलीस संभ्रमात आहेत. धारावी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये एक मीरा रोडचा फेरीवाला असून दुसरा स्थानिक पत्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)