शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

विजांचा कडकडाटासह नाशिकमध्ये जोर ‘धार’; संध्याकाळी पाचपासून आठ वाजेपर्यंत १९.३मि.मि पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 8:52 PM

अवघ्या चार तासांत १९.३मि.मि इतक्या पावसाची नोंद हवामान निरिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. सकाळी साडे आठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८.७ मि.मि इतका पाऊस पडला. दुपारपासून शहराच्या काही उपनगरीय भागांमध्ये काळे ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली.

ठळक मुद्देमागील तीन दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, दिवसभर उकाडा आणि संध्याकाळपासून पावसाचा तडाखा असाच काहीसा अनुभव नाशिककर घेत आहे. रात्री साडेआठ वाजेपर्यंत अवघ्या चार तासांत १९.३मि.मि इतक्या पावसाची नोंद हवामान निरिक्षण केंद्रात

नाशिक : मान्सूनचा परतीचा प्रवास संथगतीने सुरू असल्यामुळे आॅक्टोबरमध्येही पावसाची ‘जोर’ धार हजेरी पहावयास मिळत आहे. मागील तीन दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, दिवसभर उकाडा आणि संध्याकाळपासून पावसाचा तडाखा असाच काहीसा अनुभव नाशिककर घेत आहे. सोमवारी दुपारी पावसाला सुरूवात झाली; मात्र संध्याकाळी पाच वाजेपासून पावसाचा जोर वाढला. रात्री साडेआठ वाजेपर्यंत अवघ्या चार तासांत १९.३मि.मि इतक्या पावसाची नोंद हवामान निरिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. सकाळी साडे आठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८.७ मि.मि इतका पाऊस पडला.दुपारपासून शहराच्या काही उपनगरीय भागांमध्ये काळे ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली.

मुंबई नाक्यापासून पुढे शहराच्या मध्यवर्ती भागात संध्याकाळी साडेसहा वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. देवळाली कॅम्प, इंदिरानगर, पाथर्डी, वडाळागाव, आंबेडकरनगर, अशोकामार्ग आदी भागात पावसाने सलामी दिली होती. संध्याकाळी मुंबई नाका, सीबीएस, गंगापूररोड, कॅनडा कॉर्नर, गंगापूररोड, सातपूर, सिडको, पंचवटी, जुने नाशिक आदी परिसराला पावसाने झोडपून काढले. या भागातील रस्ते जलमय झाले होते. पावसाच्या आगमनामुळे विक्रेत्यांसह दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. शाळा-महाविद्यालय, कार्यालये सुटण्याच्या वेळेत पावसाने वर्दी दिल्याने विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचे हाल झाले. रविवारी सकाळी साडे आठ वाजेपासून रात्री साडे आठ वाजेपर्यंत १०.३ मि.मि इतका पाऊस झाला होता. रविवारच्या तुलनेत आज दुप्पट पाऊस नाशिकमध्ये झाल्याने सर्वच रस्ते जलमय झाले होते.