शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटल्यानंतर पवार म्हणतात, "मी या वादात पडणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 07:11 IST

आयाेगाने दिलेल्या निकालाचा ‘धनुष्यबाण’ही सुप्रीम काेर्टात, शिंदे गटाने दाखल केले कॅव्हेट; ठाकरे गट लवकरच मागणार दाद

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाचा खटला सुरू असताना आता निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालाचा सामनाही सुप्रीम कोर्टात रंगण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवसेनेने आयोगाच्या निकालाविरोधात कोर्टात दाद मागण्याची तयारी सुरू केली असून, त्याआधीच शिंदे गटाच्या वतीने कॅव्हेट दाखल केले आहे. 

ठाकरे गटाकडून उद्या, सोमवारी  सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. शिंदे गटाकडूनही तातडीने हालचाल करीत शनिवारी सुप्रीम कोर्टात यावर कॅव्हेट दाखल करण्यात आले. आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय ठाकरे गटाच्या याचिकेवर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती शिंदे गटाने या कॅव्हेटच्या माध्यमातून केली आहे. 

मंगळवारपासून काेर्टात सुनावणीसत्तासंघर्षावर मंगळवारपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या खटल्याच्या गुणवत्तेच्या आधारे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ हे प्रकरण सात सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवते, की १६ आमदारांच्या अपात्रतेवर हेच खंडपीठ निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पुन्हा उठता येणार नाही, असे चीतपट केले भाजपसोबत राहून युतीत आमची पंचवीस वर्षे सडली, असे विरोधक म्हणत होते. त्याच विरोधकांना दोन्ही काँग्रेसने रस्त्यावर आणले. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन आम्ही कोल्हापूरच्या भाषेत सांगायचे झाल्यास पुन्हा उठता येणार नाही, असे चीतपट केले. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री 

या वादात पडणार नाही : शरद पवारसध्या जो काही धनुष्यबाण वाद सुरू आहे, यामध्ये मी पडणार नाही. यावर मी स्पष्टपणे सांगितले आहे अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तर निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जावे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

ठाकरे गटाकडून मशाल चिन्हही जाणार?उद्धव ठाकरे जे मशाल चिन्ह घेऊन निवडणुकींना सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत ते मशाल चिन्हही आता त्यांच्याकडून हिरावले जाण्याची शक्यता आहे. कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंतच हे चिन्ह असेल असे आयोगाचे म्हटले असताना आता या  ‘मशाल’ चिन्हावर समता पार्टीनेही दावा केला आहे. मशाल चिन्हाबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोत, असे समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे