राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. आज नगरपंचायती आणि नगर परिषदांसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान, काल प्रचारसभांच्या तोफा थंडावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. काल गुट्टे यांनी मुंडे यांच्याबाबतीत मोठा गौप्यस्फोट केला. "धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण दिवंगत भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं, तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात, याची देखील मला माहिती आहे, असा खळबळजनक दावा गुट्टे यांनी केला.
आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले, धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं, तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील मला माहिती आहे, पण मी सगळेच आता काढणार नाही. तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार, असा इशारा गुट्टे यांनी दिला.
तुम्ही तर विजय मल्ल्या आहात
"तुम्ही मला नीरव मोदी म्हणालात, पण तुम्ही तर विजय मल्ल्या आहात, कारण विजय मल्ल्याच्या आवडी आणि तुमच्या आवडीनिवडी एकच आहेत. तुम्ही गंगाखेडला आलात, मला तर परळीला यायला फक्त पंधरा मिनिटं लागतात, मी राजा आहे, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो, मी त्या पक्षांच्या स्टेजवर जाईन पण धनु भाऊ तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांना दिला.
तुम्ही मला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली, त्यांच्यासाठी किती ताकद लावली, हे देखील मला माहित आहे. पण माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे, त्यामुळे माझा पराभव होऊ शकला नाही, असंही गुट्टे म्हणाले.
Web Summary : Rattnakar Gutte alleged Dhananjay Munde was saved from a murder attempt in Indore by Bhayyuji Maharaj. Gutte also compared Munde to Vijay Mallya and vowed to defeat him, claiming knowledge of Munde's past actions and political maneuvers.
Web Summary : रत्नाकर गुट्टे ने आरोप लगाया कि धनंजय मुंडे को इंदौर में भय्यूजी महाराज ने हत्या के प्रयास से बचाया था। गुट्टे ने मुंडे की तुलना विजय माल्या से भी की और उन्हें हराने की कसम खाई, मुंडे के अतीत के कार्यों और राजनीतिक चालों की जानकारी होने का दावा किया।