धनंजय मुंडेंना कोणत्याही क्षणी अटक !

By Admin | Updated: January 13, 2015 03:01 IST2015-01-13T03:01:37+5:302015-01-13T03:01:37+5:30

मुंडेंसह संचालकांनी नियमित जामिनासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयात न्या. टी. व्ही. नलावडे यांच्यापुढे सुनावणीसाठी आला

Dhananjay Mundena arrested at any time! | धनंजय मुंडेंना कोणत्याही क्षणी अटक !

धनंजय मुंडेंना कोणत्याही क्षणी अटक !

औरंगाबाद : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जाची परतफेड न करणे व कर्जाच्या रकमेचा दुरुपयोग करणे यासंदर्भात दाखल गुन्ह्यांत जगमित्र सहकारी सूतगिरणीचे संचालक तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह संचालक मंडळाच्या १७ सदस्यांना अटक करण्याचा मार्ग सोमवारी मोकळा झाला.
मुंडेंसह संचालकांनी नियमित जामिनासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयात न्या. टी. व्ही. नलावडे यांच्यापुढे सुनावणीसाठी आला, तेव्हा न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार सूतगिरणीने जिल्हा बँकेस दिलेला २.४३ कोटींचा धनादेश न वटता परत आल्याचे सरकारी वकिलाने निदर्शनास आणले. तत्पूर्वी या संचालकांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज परत घेण्याची मुभा न्यायालयाने दिली. ही परवानगी घेताना संचालकांना यापूर्वी दिलेल्या अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण काढून घेत त्यांना अटक करण्याचा पोलिसांना अधिकार असल्याचे नमूद केले. न्यायालयाच्या या आदेशाने मुंडेंसह १७ संचालकांना पोलीस कोणत्याही क्षणी अटक करू शकतात. (प्रतिनिधी)

Web Title: Dhananjay Mundena arrested at any time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.