शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोरोनावर मात करून कामाला सुरुवात; मुंडेंनी शरद पवारांकडे सादर केला कार्य अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 16:36 IST

धनंजय मुंडेंकडून कार्य अहवाल सादर; शरद पवारांकडून कौतुकाची थाप

मुंबई : कोरोनावर मात करून पुन्हा सक्रिय झालेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी त्यांच्या कामाचा अहवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सादर केला. जून ते ऑगस्ट या कालावधीत केलेल्या कामाचा अहवाल मुंडेंनी तयार केला आहे. मुंडेंनी केलेल्या कामाचा अहवाल पाहून शरद पवारांनी त्यांचं कौतुक केलं.धनंजय मुंडेंनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्याकडे कोरोनावर मात केल्यानंतर जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत केलेल्या कामकाजाचा अहवाल सादर केला. हा कार्य अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही सादर केला जाणार आहे. परळी, बीड व मुंबई असा सातत्याने प्रवास, अनेक लोकांशी थेट संपर्क यादरम्यान जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंडेना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामकाजाचा अहवाल त्यांनी कोरोना वॉर्डमधून सादर केला होता. कोरोनावर मात करून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे परत कामाला लागले होते.

लॉकडाऊनच्या कठीण काळात वंचित-निराधार, दिव्यांग आदींना सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून भरीव मदत करता आली. प्रत्येक जिल्ह्यात उभारलेल्या कोरोना मदत कक्षाद्वारे हजारो दिव्यांग बांधवांना मदत करता आली. बीड जिल्ह्यातील पीक विम्याचा गंभीर प्रश्न सोडवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विक्रमी पीकविमा प्रस्ताव भरले. जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदीने मागील दहा वर्षातला उच्चांक गाठला याबाबत मुंडेंनी अहवालाच्या सुरुवातीला व्यक्त केलेल्या मनोगताद्वारे समाधान व्यक्त केले आहे. तर शेतकरी कर्जमाफी व त्याला अनुसरून सुरू असलेले पीककर्जाचे वाटप, त्यावर असलेले बारीक लक्ष तसेच बँकांची उदासीनता यावर चिंताही व्यक्त केली आहे.दरम्यान, मुंडे यांनी सादर केलेल्या जून ते ऑगस्ट २०२० च्या ४९ पानी अहवालामध्ये त्यांच्या विभागामार्फत नुकतेच घोषित केलेले नवउद्योजकांसाठीचे १०० कोटींचे पॅकेज, स्वाधार योजनेतील आर्थिक तरतूद, बीएएनआरएफ अधिछात्रवृत्ती यासह विभागातील महत्वाचे निर्णय, बैठका आदींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील कोविडची सद्यस्थिती, नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलची माहिती यासह पीकविमा, कापूस खरेदी आदी सर्वच बाबींवर प्रकाश टाकला आहे.मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यापासून अविरतपणे कार्य अहवाल सादर करून त्याद्वारे पक्षाला, राज्य सरकारला तसेच राज्यातील तमाम जनतेला जाहीरपणे आपली कामे अहवाल स्वरूपात सादर करण्याची अभिनव परंपरा जपल्याबद्दल मुंडे यांचे शरद पवार यांनी विशेष कौतुक केले आहे. तसेच पुढेही ही परंपरा अबाधित ठेवावी असा सल्ला पवारांनी मुंडे यांना दिला आहे. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या