शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाड कोणत्या अवस्थेत बोलले ते पाहावे लागेल, शुद्धीत आल्यावर...; धनंजय मुंडेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 13:12 IST

NCP Dhananjay Munde Vs Jitendra Awhad: एखादा माणूस शुद्धीत नसल्यावर चुकीचे बोलतो, काहीही बरळतो, शुद्धीवर आल्यावर खरे कबूल करतो, तसाच हा प्रकार आहे, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला.

NCP Dhananjay Munde Vs Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबाबत केलेल्या विधानावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. जोरदार टीका झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आपल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली. काही पुरावे दाखवत जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले. यातच आता अजित पवार गटाचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत, खोचक शब्दांत टीका केली. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, तुम्ही देवाला मानता. देव सर्वांचा आहे. प्रभू रामचंद्रांबाबत देशवासीयांच्या मनात आगळे-वेगळे स्थान आहे. त्या प्रत्येकाच्या भावना दुखावणे, एवढेच काम असेल आणि आपल्या मतदारसंघातील ठराविक मतदारांसाठी चुकीची विधाने केली. आता त्यावेळी कोण काय खात होते, याचे ते साक्षीदार होते का? त्यांचे आजोबा काय जेवत होते, याचे तरी ते साक्षीदार आहेत का? मीही अशा घटनांचा साक्षीदार नाही. त्यामुळे कोणी काय खावे आणि काय नाही, याबाबत बोलणे योग्य नाही, या शब्दांत धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला.

जितेंद्र आव्हाड कोणत्या अवस्थेत बोलले ते पाहावे लागेल, शुद्धीत आल्यावर...

जितेंद्र आव्हाड यांनी कोणत्या अवस्थेत ते वक्तव्य केले, कोणत्या अवस्थेत माघार घेतली, ते पाहावे लागेल. ज्या अवस्थेत ते आधी बोलले ती अवस्था आणि माघार घेतली तेव्हाची त्यांची अवस्था काय होती ते पाहायला हवे. एखादा माणूस शुद्ध नसल्यावर चुकीचे बोलतो, बेशुद्ध असल्यावर काहीही बरळतो, परंतु, शुद्धीवर आल्यावर खरे कबूल करतो, तसाच हा प्रकार आहे. हे सगळे गोंधळात टाकणारे आहे, असे सांगत धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त विधान केल्याने राजकीय गदारोळ झाला. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर  दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या विधानावरून विरोधकांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर गुरुवारी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर आव्हाड हे दुतोंडी साप असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड