Dhananjay Munde : नशाबंदी मंडळाचे अनुदान तत्काळ वितरीत करा, धनंजय मुंडेंचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 09:19 PM2021-08-04T21:19:04+5:302021-08-04T21:20:00+5:30

Dhananjay Munde : नशाबंदी मंडळाचे काम आणि राज्याची व्याप्ती पाहता दरवर्षी वितरीत होणाऱ्या अनुदानात वाढ करून ती 30 लाखावरून 60 लाख इतकी करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले.

dhananjay munde grants 54 lakh rupees to Nashabandi Mandal Maharashtra | Dhananjay Munde : नशाबंदी मंडळाचे अनुदान तत्काळ वितरीत करा, धनंजय मुंडेंचे निर्देश

Dhananjay Munde : नशाबंदी मंडळाचे अनुदान तत्काळ वितरीत करा, धनंजय मुंडेंचे निर्देश

Next

मुंबई : नशाबंदी मंडळ ही शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यरत असलेली एकमेव अनुदानित संस्था आहे. राज्यातील भावी पिढी व्यसनाधीन होऊ नये, यासाठी ही संस्था काम करते. त्यामुळे पूर्णवेळ कार्यरत असलेल्या या मंडळाचे 2018 पासूनचे 54 लाख 15 हजार रुपयांचे अनुदान तत्काळ देण्यात यावे, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बुधवारी दिले. 

याचबरोबर, काळाची गरज ओळखून नशाबंदी संदर्भात मोठ्या प्रमाणात तरूणांचे प्रबोधन अत्यावश्यक असून त्याद्वारे महाराष्ट्राची प्रगती साध्य करता येणार आहे. नशाबंदी मंडळाचे काम आणि राज्याची व्याप्ती पाहता दरवर्षी वितरीत होणाऱ्या अनुदानात वाढ करून ती 30 लाखावरून 60 लाख इतकी करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले.

नशाबंदी हा संवेदनशील विषय असून, याबाबत तरुणांमध्ये जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. 2020-21 या आर्थिक वर्षातील एकूण देय अनुदानापैकी 14.85 हजार इतके अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहीम आणि व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांना तीन कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

व्यसनमुक्ती धोरणाअंतर्गत प्रत्येक महसुली विभागास दोन याप्रमाणे व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या 12 संस्थांना प्रत्येकी 11 लाख अशी एकूण एक कोटी 32 लाख याचबरोबर राष्ट्रीय महात्मा गांधी पुरस्कार व सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तीन कोटी रक्कम वितरीत करण्यात येत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.


दरम्यान, मंत्रालयात नशाबंदी मंडळ या संस्थेच्या अनुदान व कामकाजा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव दि.रा. डिंगळे आदिसह नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष माजी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ राजेंद्र वेळुकर, कार्याध्यक्ष आयुक्त आर.के. गायकवाड, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, कार्यकारिणी सदस्य प्रिया पाटील, डॉ. प्रभा तिरमारे, प्रिया पाटील हे उपस्थित होते.

Web Title: dhananjay munde grants 54 lakh rupees to Nashabandi Mandal Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.