धनंजय देसाईला न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: June 24, 2014 23:21 IST2014-06-24T23:21:40+5:302014-06-24T23:21:40+5:30
हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याची मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला कॅन्टोन्मेट न्यायालयात हजर करण्यात आले.

धनंजय देसाईला न्यायालयीन कोठडी
>पुणो : फेसबुकवरील आक्षेपार्ह प्रकरणाच्या तणावानंतर हडपसर येथे झालेल्या खून प्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याची मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला कॅन्टोन्मेट न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
हडपसर येथे आयटी इंजिनियर मोहसीन शेख याचा खून झाल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या देसाईसह 21 जणांना अटक
करण्यात आली होती.
या गुन्ह्यातील 2क् आरोपींकडे तपासासाठी पोलिसांना पोलिस कोठडीचा पुरेसा अवधी मिळाला होता मात्र या प्रकरणी देसाईला एक दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर तात्काळ न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
पोलिसांनी, देसाईच्या न्यायालयीन कोठडीचा निर्णय बाजूला ठेवून 8 दिवसांची पोलिस कोठडी मिळावी यासाठी सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या न्यायालयात रिव्हीजन दाखल केले होते. न्यायालयाने तो मंजूर करून त्याला 24 जूनपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मंगळवारी त्याची मुदत संपलयाने कॅन्टोन्मेट न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने देसाईची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.