धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी उद्या
By Admin | Updated: November 28, 2014 00:59 IST2014-11-28T00:59:52+5:302014-11-28T00:59:52+5:30
लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चिटणीस पार्क, महाल येथे आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेच्या

धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी उद्या
गोवा व महाराष्ट्रातील संघांचा दांडिया आविष्कार
नागपूर : लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चिटणीस पार्क, महाल येथे आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाई व ‘ऐका दाजिबा’फेम वैशाली सामंत यांचा सुपरहीट गीतांचा नजराणा राहणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परिक्षक स्टार प्रवाहवरील जयोस्तुते मालिकेचे निर्माता महेश कोठारे, रुंजी मालिकेतील मिनाक्षी पिटकर (सुरेखा कुडची), लक्ष्य मालिकेतील पोलीस निरीक्षक रेणुका राठोड (श्वेता शिंदे), तर पुढचे पाऊल मालिकेतील कल्याणी (जुई गडकरी) राहतील.
हा कार्यक्रम सर्वांसाठी नि:शुल्क असून लोकमत सखी मंच सदस्य, युवा नेक्स्ट सदस्यांना ओळखपत्रावर प्रत्येकी दोन पासेस तर दांडियाच्या जाहिरातीचे कात्रण आणणाऱ्यांनाही दोन पासेस मिळणार आहे. पासेस सकाळी ११ ते ६ वाजेदरम्यान लोकमत सखी मंचच्या कार्यालयात मिळतील. दरवर्षी गोव्यासह महाराष्ट्रातही ही स्पर्धा घेण्यात येते. प्राथमिक फेरी, जिल्हास्तरीय फेरी, उपांत्यपूर्व फेरी आणि अंतिम फेरी, असे स्पर्धेचे स्वरूप असते. यामध्ये पहिला पुरस्कार ५१,०००, द्वितीय पुरस्कार ३१,००० तर तिसरा पुरस्कार २१,००० रु. दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचे सहप्रायोजकत्व रायसोनी समूहाचे असून, पारितोषिक प्रायोजक युनिक स्लीम पॉर्इंट अॅन्ड ब्युटी क्लिनिक हे आहेत. विशेष सहकार्य शशिकांत बोदड यांचे आहे. अधिक माहितीकरिता नेहा जोशी ९८५०३०४०३७, ९९२२९६८५२६ व २४२९३५५ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
धमाल दांडियाची विदर्भ फेरी आज
धमाल दांडिया स्पर्धेची नागपूर आणि विदर्भ फेरीचे आयोजन २८ नोव्हेंबर रोजी कॉटनमार्केट मार्गावरील गीता मंदिरात करण्यात आले आहे. नागपूर फेरी सकाळी १० वाजता तर विदर्भ फेरी १२ वाजता होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सखी व वाचक वर्ग सादर आमंत्रित आहे.